ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकूचा धाक दाखवून जबरी चोरीचा प्रयत्न करणारे दोन आंतरराज्यीय आरोपी जेरबंद

१२.६८ लाखांच्या मुद्देमालासह महिंद्रा XUV ५०० कार, बनावट नंबर प्लेट्स व चाकू जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पतीसोबत उपचारावरून गावी परतणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना वडनेर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान तत्परतेने पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी श्री. गुणवंत वसंतराव झाडे (रा. छोटी आर्वी, ता. हिंगणघाट ) हे आपल्या पत्नीवर उपचार करून गावी परत जात असताना, दोन अज्ञात इसमांनी त्यांना गाठून चाकूचा धाक दाखवला व त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तक्रारदाराच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन वडनेर येथे अपराध क्रमांक २८७/२०२६, कलम ३०९(९), ३(५) बी.एन.एस. (BNS) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) नायक साहेब यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली वडनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने परिसरात तात्काळ नाकाबंदी लावली. नाकाबंदीदरम्यान पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या खालील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली:

१. विशालसिंग दयालसिंग गवारीया वय २६ वर्ष, व्यवसाय – मेकॅनिक, रा. सुभाषनगर, ता. जि. भिलवाडा, राज्य – राजस्थान,

२. सांवरमल माधवलाल लोहार वय २५ वर्ष, व्यवसाय – फर्निचरकाम, रा. सुरास, ता. रायपूर, जि. भिलवाडा, राज्य – राजस्थान

आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली महागडी कार, बनावट नंबर प्लेट्स, मोबाईल व हत्यारासह पांढऱ्या रंगाची महिंद्रा XUV 500 कार क्रमांक RJ 06 BU 2005 – किंमत १२,००,०००/- इतर राज्यांतील क्रमांकाच्या एकूण ०६ नंबर प्लेट्स – किंमत ३,०००/- ओप्पो A59 5G किंमत ₹१०,०००/- व्हिव्हो V70 इलाईट किंमत ३५,०००/- ओप्पो A6X किंमत अंदाजे २०,०००/- एक काळ्या रंगाचा धारदार चाकू किंमत ३००/- असा एकूण १२.६८००० रु चा माल जप्त करण्यात आला,

आरोपी हे राजस्थान येथील रहिवासी असून त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या विविध राज्यांतील नंबर प्लेट्सवरून त्यांनी इतरही काही ठिकाणी गुन्हे केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस स्टेशन वडनेर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

सदर ची कार्यवाही मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा. श्री. सदाशिव वाघमारे, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांचे मार्गदर्शनात श्री सुशीलकुमार नायक उपविभागीय पोलिस अधिकारी, हिंगणघाट यांचे दिशानिर्देशात पोलिस स्टेशन वडणेरचे सहायक पोलिस निरीक्षक घनशाम पाटील, पो उपनि भारत वर्मा, पोलिस अंमलदार सचिन रोकडे, आकाश चनूरवार, हिमांशु टापरे, राजू निरगुडवार सर्व पोलिस स्टेशन वडणेर यांनी केली

,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये