ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
क्रांती दिनी नागपूर येथील आंदोलनाच्या तयारीसाठी चंद्रपूर येथे ३१ जुलैला विराआंस ची जिल्हा बैठक

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांतीदिनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपूर येथे दीक्षाभूमी ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक दरम्यान आयोजित ” विदर्भ लाँग मार्च ” व जाहिर सभेची तयारी आणि दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे आयोजित विदर्भ जनसंकल्प मेळाव्याची तयारी यासह अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हा बैठक दिनांक ३१ जुलै २०२६, रोज शुक्रवार ला दुपारी एक वाजता चंद्रपूर विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा विदर्भ राज्य आंंदोलन समितीने केले आहे.
या बैठकीचे अध्यक्षस्थान विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप हे भूषवणार आहेत. बैठकीला युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरूणभाऊ केदार, माजी मंत्री रमेशकुमार गजबे, जिल्हाध्यक्ष किशोर दहेकर, महासचिव अंकुश वाघमारे, शालिक माऊलीकर, सुनिल बावणे, पूर्व विदर्भ युवा अध्यक्ष कपिल इद्दे, मितीन भागवत, रमाकांत मालेकर, ॲड.तबस्सुम शेख, ॲड.प्रफुल्ल आस्वले, पराग गुंडेवार, मारोती बोथले, मुन्नाभाऊ खोब्रागडे, गोपी मित्रा, मुन्ना आवळे, किशोर दांडेकर, अरुण सातपुते, पुंडलिक गोठे, संजय भीमनवार, रामकृष्ण सांगळे, दिलीप देठे, मधुकर चिंचोलकर यांचेसह समितीचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व विदर्भवादी कार्यकर्ते व नागरिकांनी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे.



