अवैध्यरित्या देशी दारुची साठवणुक करण्याऱ्यावर देवळी पोलीसांची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने जिल्हामध्ये मद्याची विक्री, वाहतुक व साठा करण्यास कायद्याने प्रतिबंध आहे असे असतांना अवैध्य रित्या देशी मद्याची साठवणुक करीत असल्याची गोपणीय माहीती पोलीस स्टेशन देवळी चे पथकास प्राप्त झाली. प्राप्त माहीतीच्या आधारे दिनांक 28/06/2026 रोजी 23/15 वा. ते 23/45 वा. दरम्यान गोंडपुरा वार्ड क्र.14 देवळी येथे सापळा रचुन संशयीत घराची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान घरात देशी मद्याची विविध बाटल्या/बाँक्स आढळुन आले. संबधीत व्यक्तीकडे मद्य साठवणुक व विक्री संदर्भातील कोणतेही वैदय परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
सदर कार्यवाही दरम्यान आरोपी नामे कुणाल मारोतराव आंबटकर वय 19 वर्षे रा. गोंडपुरावार्ड क्र 14 यास ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कडुन खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
1) 15 खड्याचे खोक्यामध्ये 180 एम.एल.च्या देशी दारुने भरलेल्या गोवा संत्रा नं 1 कंपनीच्या 720 शिशा किंमत 1,44,000/- रुपये.
2) एक विवो कंपनिचा अँड्रॉईड मोबाईल की. 10,000/-रु.
3) अंगझडतीत नगदी 2,310/- रु एकुण जप्त मुद्देमाल किंमत 1,56,310/-रुपये चा माल या प्रकरणी आरोपी विरुध्द देवळी पोलीस स्टेशन येथे दारुबंदी कायदया नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक सा. वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधिक्षक सा. वर्धा व श्रीमती वंदाना कारखेले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव यांच्या पर्यवेक्षणाखाली ठाणेदार श्री संदीप कापडे सा यांचे निर्देशाप्रमाने पोलीस हवालदार नितीन तोडासे, रितेश शर्मा पोलीस अंमलदार सागर पवार, श्याम गावनेर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
पोलीसांचे नागरीकांना आहवान
वर्धा जिल्हा दारुबंदी असल्याने कोणत्याही प्रकारे अवैध्य मद्याची वाहतुक, विक्री किंवा साठा करणे हा दंडणीय गुन्हा आहे. अश्या प्रकारची कोणतीही माहीती नागरीकांना मिळाल्यास त्यांनी तात्काळ जवळचे पोलीस स्टेशनशी किंवा डायल 112 वर संपर्क साधावा माहीती देण्याऱ्याची ओळख गोपणीय ठेवण्यात येईल..



