गोंडपिपरी शहराला अस्वच्छतेचे ग्रहण
नगरपंचायत अधिकाऱ्यांची उदासीनता, कामगारांची उपासमार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
स्वच्छ भारत मिशन ला हरताळ फासत गोंडपिपरी नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला पाठीशी घालत अक्षरशः शहराला वेठीस धरल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. यामुळे शहरात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले असून, नगर पंचायतीच्या स्वच्छता अभियानाला ग्रहण लागल्याचे चित्र निर्माण झाले असून, हे अस्वच्छतेचे ग्रहण कायमचे सुटणार की नाही, असा प्रश्न नगरवासियांना पडला आहे.
शहरातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नाही. तर, काही नाल्यांचा उपसा केला असता, उपसलेली घाण उचलल्या जात नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सार्वजनिक धार्मिक प्रार्थना स्थळाशेजारी पसरलेली अस्वछता वगटारातील उपसलेली घाण कित्येकदिवस पड़ून असल्याने दुर्गधी पसरलेली आहे. तर, बाजारात सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून नगर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. गावातील बहुतांश नाल्या कचरा आणि घाणयुक्त गाळाने तुडुंब भरल्या असून, येणाऱ्या पावसाळ्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट होणार आहे. नाल्यांमधुन पसरणारी दुर्गंधी आणि वाढता डासांचा पादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
दुसरीकडे, सार्वजनिक शौचालयांमध्ये स्वचछतेच्या मुलभूत सुविधांचा अभाव असून, यामूळे शौचालय वापरणे अशक्य झाले आहे. विशेषतः महिला आणि मुलींसाठी ही परिस्थिती असुरक्षित आणि संतापजनक बनली आहे. स्थानिक नागरिकांनी नगर पंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च होत असताना प्रत्यक्षात गावात कोणतीही सुधारणा दिसत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासन केवळ कागदोपत्री स्वच्छता दाखवत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. गावातील नाल्यांची नियमित साफसफाई, प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत. शहरातील स्वच्छतेची परिस्थिती आणखी बीकट होऊन त्याचा विपरीत दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मागील पंधरा दिवसापासून या परिसरातील गटारातील घाण मलबा उपसण्यात आला नाही, घरोघरी कचऱ्याचा खच साचला आहे. मात्र, त्याची उचल करण्याऐवजी तिथेच असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गटारांची घाण रस्त्यावर पसरली असल्याने नागरिकांना ये-जा करणे असह्य होत आहे.
*_स्वच्छतेसाठी प्रयत्न करू*
शहरातील स्वच्छतेबाबत नगर सेवकांनी अभियंता उमेश शेंडे यांना विचारणा केली असता, “फक्त प्रयत्न करू.”, असे उत्तर देऊन वेळ मारून नेत आहेत. यामुळे नगर पंचायत प्रशासन स्वच्छतेबाबत किती संवेदनशील आहे, हे दिसून येते
*नगरसेवक घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट*
_मागील दहा दिवसापासून गावातील मजुरांनी स्वच्छतेची कामे बंद केली आहेत. मजुरांचा ईपीएफ (भविष्य निर्वाह निधी) जवळपास ५ लक्ष रु भरला नाही. त्यामुळे कामबंद आंदोलन सुरू केले असल्याचे मजुरांनी सांगितले. ही बाब अत्यंत गंभीर आहे. याबाबत सर्व नगर सेवक नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
*सुनील संकुलवार,नगरसेवक*
*नगरपंचायत गोंडपिपरी*



