ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भरधाव पिकअपची कारला धडक _ आक्सापूर जंगल परिसरातील अपघात

वडिलाचा जागीच मृत्यू तर मुलगा _ मुलगी गंभीर जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

 चंद्रपूर-कोठारी मार्गावरील आक्सापूर लगत असलेल्या जंगल परिसरात शनिवारला (दि. १८ एप्रिल) रात्रौ दहा च्या सुमारास भरधाव पिकअप ने कारला दिलेल्या जोरदार धडकेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा _ मुलगी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाचे नाव शिमोन डोनू गणवीर (वय ५३) रा. विठ्ठलवाडा व मुलगा रोहित शिमोन गणवीर (वय२५) आणि मुलगी ईशा शिमोन गणवीर(वय २२) गंभीर जखमी असून पुढील उपचारासाठी कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता चंद्रपूर ला हलवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिमोन डोनू गणवीर हे मुलगा व मुलीसह आपल्या कार नी चंद्रपूर वरून विठ्ठलवाडा गावाकडे जात होते. दरम्यान, गोंडपिपरी कडून पिकअप क्रमांक एम एच ३४,बीजी ८९७६ आक्सापूर मार्गे कोठारी कडे भरगाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या कार क्रमांक एम एच ३४ बिआर ०८५९ ला जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की या भीषण अपघातात शिमोन डोनू गणवीर (शिक्षक, जिल्हा परिषद कन्या शाळा गोंडपिपरी) यांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात मुलगा व मुलगी गंभीर जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच सुरजागड चे पेट्रोलिंग अधिकारी प्रदीप येल्लुरे व कोठारी पोलीस स्टेशन चे कर्मचारी घटनास्थळी तातडीने हजर होऊन जखमी ना कोठारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले.मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलवण्यात आले असून पुढील तपास कोठारी पोलीस करीत आहे. या घटनेने गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील गणवीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये