ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई, सलग दुसऱ्या दिवशी “हायवा जप्त”

मंडळ अधिकारी सुकेसिनी कांबळे यांचा रेती माफियांना दणका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात सध्या अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी सुकेसिनी कांबळे यांचा रेती माफियाविरुद्धचा धडाका. आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय देत कांबळे यांनी सलग दुसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करणारा एक ‘हायवा’ पकडून मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे आणि त्यांचे पथक रात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना, रात्री १०:४५ च्या सुमारास नगरपंचायत परिसराजवळ एक संशयास्पद हायवा (क्र. एम.एच.३४. सी.क्यू.२१४१) येताना दिसला. महसूल पथकाने तात्काळ वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात अवैध रेती भरलेली आढळली. जेव्हा चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना किंवा रॉयल्टी पावती विचारण्यात आली, तेव्हा त्याच्याकडे कोणतेही वैध दस्तऐवज नव्हते.

या मोहिमेत कांबळे यांच्यासोबत त्यांच्या पथकातील विकास चोपडे आणि प्रदीप नंदागवळी यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. परवाना नसल्याचे स्पष्ट होताच, कोणताही विलंब न लावता सदर हायवा जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. एका पाठोपाठ एक, म्हणजेच आधी एक हायवा आणि एक ट्रॅक्टर पकडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केलेली ही कारवाई रेती माफियांसाठी मोठा इशारा मानली जात आहे.

मंडळ अधिकारी सुकेसिनी कांबळे सध्या जबरदस्त ‘फॉर्म’मध्ये असून, त्यांच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे तालुक्यात अवैध रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रात्रीच्या अंधारात छुप्या पद्धतीने रेतीची चोरी करणाऱ्यांना आता महसूल पथकाचा मोठा धाक निर्माण झाला आहे.

    महसूल मंडळ अधिकारी सुकेसिनी कांबळे यांच्या या निडर कारवाईचे सर्वसामान्य जनतेतून भरभरून कौतुक होत असून, अशाच प्रामाणिक अधिकाऱ्यांमुळे प्रशासनाचा वचक निर्माण होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

    शासकीय महसुलाची चोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी आमची कारवाई अशीच सुरू राहील,” असा कडक संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

         *सुकेसिनी कांबळे, मंडळ अधिकारी*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये