ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 18 एप्रिल 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथक उपविभाग हिंगणघाट परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पोलीस स्टेशन समुद्रपुर हद्दीतील मौजा कोरी, तह. समुद्रपुर येथे कमलाकर चिंतामन वावधणे याचे राहते घरी एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता,

नमुद गुन्हेगार हा गांजा अंमली पदार्थाची विक्री करतांना मोक्कावर रंगेहाथ मिळुन आल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीचे ताब्यातुन निव्वळ 02 किलो 151 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, गुन्ह्यात गांजा मालाची वाहतुकीकरीता वापरलेली पॅशन प्रो कंपनीची मोटर सायकल क्र. एम.एच. 32 ए.एम. 1627 व मोबाईलसह जु.कि. 1,34,775 रू चा मुद्देमाल जप्त करून, नमुद आरोपी व त्यास गांजा माल पुरवठा करणारा आरोपी नामे शेख अलीम शेख रमजान रा. मोठा ताज बाग जवळ आदर्श नगर नागपुर असे दोघांविरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राउत, दिनेश बोथकर, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये