ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू पिवून दारूच्या नशेत मोटार सायकल चालविणारे चालकावर वाहतूक पोलिसांची कार्यवाही

मोटार सायकल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि. 18/04/26 रोजी 18/00 वा मा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांच्या आदेशानव्ये बजाज चौकात वाहतूक अंमलदार यांची नाकाबंदी ड्युटी नेमलेली असताना एक हिरो होंडा मोटार सायकल क्र mh 32 AY 9334 हा अतिवेगाने व निष्काळजीपणे गाडी चालवीताना दिसून आला त्याची गाडी त्याला व्यवस्थित चालविता येत नव्हते त्यावरून वाहतूक अंमलदार ASI धीरज पांडे यांनी त्याच्या जवळ जावून विचारपूस केली असता त्याचा तोंडाचा आंबट उग्रट दारू पिल्याचा वास आला त्यावरून त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नावं प्रदीप दशरथ कुंभारे वय 40 रा रामनगर असे सांगितले त्याचे दारू पिणे बाबत तपासानी केली असता त्याचे रक्तात 404 MG अल्कोहोल चे प्रमाण आढळून आलेत त्यावरून सदर हिरोहोंडा मोटार सायकल न MH 32 AY 9434 चा चालक प्रदीप दशरथ कुंभारे वय, 40 रा रामनगर वर्धा याच्या विरुद्ध पो. स्टे. वर्धा शहर येथे मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवून सदर मोटार सायकल ही जप्त करण्यात आलेली आहे.

सदर कार्यवाही ही सहाय्यक पोलीस उप निरीक्षक धीरज पांडे, मुन्ना तिवारी पोलीस हवालदार दिलीप कामडी, प्रदीप कोहळे ने वाहतूक शाखा यांनी केलेली आहे, वाहन चालवीतना दारू पिवून वाहन चालवू नयेत अपघात टाळlवे असे आवाहांन वाहतूक नियंत्रण शाखा यांनी केलेले आहे,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये