ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नीलिमा चव्हाण यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करुन फाशीची शिक्षा द्या

नाभिक समाज संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

              ओमळी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील कु. नीलिमा सुधाकर चव्हाण वय २४ वर्षे हि दापोली येथील स्टेट बँक येथे कंत्राटी कामावर नौकरीवर होत्या दि. २९/७/२०२३ रोजी कामावरुन परत येत असताना तिचे अपहरण करून तिच्यांवर अत्याचार करून डोक्यावरील केस काढून चेहरा विदृप करून खुन करण्यात आला. तिचा मृतदेह दाभोळ खाईमध्ये दि. ०१/०८/२०२३ ला आढळून आला नाभिक समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील ह्या मुलीचा खून करणाऱ्या नराधमाला अटक करून कठोरातील कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा नाभिक समाज संघटना रस्त्यावर उतरले व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, पालकमंत्री मा.ना.सुधीर मुनगंटीवार व आ. प्रतिभाताई धानोरकर यांना प्रतिलिपी पाठविण्यात आले आहे.

      यावेळी उपस्थित भद्रावती नाभिक समाजाचे अध्यक्ष बंडू व्ही लांडगे, नाभिक सलुन दुकानदार असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन नक्षिणे, नाभिक युवा शक्ती चंद्रपूर जिल्हा सदस्य राजेश येसेकर,नाभिक महिला संघटनेच्या सचिव सौ. वर्षाताई वाटेकर, अखंड नाभिक महिला विदर्भ प्रांताध्यक्ष्या ज्योतीताई लांडगे, शोभाताई लांडगे, सविता लांडगे, नंदनी लांडगे, वैशाली दळवी, मधुकर वाटेकर, हनुमान नक्षिणे, सागर घुमे, सतिश मांडवकर, सुधीर लांडगे, पियुष घुमे, छत्रपती दैवलकर,सतिश जांभुळकर,बंडु एम लांडगे,अंकुश दर्वे,विजय मेश्राम, गणेश दैवलकर इत्यादी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये