ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

पोंभुर्णा येथे महात्मा फुले-डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती उत्साहात साजरी

सप्त खंजिरी वादक व समाज प्रबोधनकार रवी इंगोले महाराज यांचे प्रभावी कीर्तन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, तालुका पोंभुर्णा यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सप्त खंजिरी वादक व समाज प्रबोधनकार रवी इंगोले महाराज यांचे प्रभावी कीर्तन आयोजित करण्यात आले.कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन समता परिषदेचे तालुका अध्यक्ष भुजंगराव ढोले व पदाधिकाऱ्यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष डॉ. संजय घाटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन व पूजन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी नगरसेवक गणेश वासलवार, माजी नगराध्यक्ष श्वेता वनकर, नगरसेविका नंदा कोटरंगे, नगरसेवक नंदु बुरांडे, नगरसेवक तुकाराम गुरुनुले,मुल तसेच समता परिषदेचे किशोर राऊत व संदीप मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महामानवांना अभिवादन करून मार्गदर्शन करण्यात आले व सप्त खंजिरी वादक व समाज प्रबोधनकार रवी इंगोले महाराज यांच्या प्रभावी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

सत्कारमूर्ती – श्वेता वनकर, पुंडलिक गेडाम, अंजना गेडाम, तात्या मानकर, कालिदास गेडाम, नरेंद्र गुरनुले, आनंदराव बावणे,बंडू लिंगलवार,संपत कुरसंगे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समता परिषदचे सचिव जगन कोहळे उपाध्यक्ष राहुल सोमणकर, विकास ठाकरे, सहसचिव, संदीप बुरांडे, नितीन धूम्मावार, अक्षय कोसरे, नरेश ढोले व सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये