ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुरजागड, कोणसरीच्या भरधाव अवजड वाहनांवर “ब्रेक” लावण्याची मागणी

गोंडपिपरी - आक्सापूर मार्गावर सुरक्षारक्षकांची गरज ; करंजीतील शिष्टमंडळाचे तहसीलदार, ठाणेदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

 लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सुरजागड आणि कोणसरी कोणसरी लोह प्रकल्पातून कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक गोंडपिपरी तालुक्यातून केली जाते. यासाठी अवजड हायवा वाहन वापरले जात आहे. राष्ट्रीय महामार्गावर धावणारी ही वाहने भरधाव वेगात असतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दिवसागणिक भयावह ठरणारा हा प्रकार थांबविण्यासाठी या मार्गावर सुरक्षारक्षकांची गरज आहे. अशातच गोंडपिपरी शहरापासून ते आक्सापूरपर्यंत ९ किलोमीटरचा हा मार्ग अपघातासाठी “हॉटस्पॉट” ठरला आहे. यामुळे सुरजागड व कोणसरीच्या या अनियंत्रित भरधाव वाहनांवर “ब्रेक” लावण्याची गरज असून तातडीने सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी करंजी येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने गोंडपिपरीचे तहसीलदार आणि ठाणेदार यांना निवेदनातून केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारणीला वेग आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत असलेल्या कच्च्या मालाची वाहतूक गोंडपिपरी तालुक्यातून केली जाते. यासाठी म्हणून हजारो अवजड वाहने तालुक्यातून दररोज भरधाव वेगाने ये – जा करतात. ही वाहतूक जनसामान्यांच्या जीवावर उठली आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येसह अपघाताचे प्रमाण देखील दिवसागणिक वाढत आहे. अधून मधून अपघाताच्या गंभीर घटना तालुक्यात घडत आहेत. कुटुंबातील कर्ता पुरुष मंडळीचा मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या आहेत. अशातच तालुक्यातील गोंडपिपरी शहर ते आक्सापूर मार्गावर या प्रकल्पाअंतर्गत सुरक्षारक्षकाची नेमणूक अद्याप करण्यात आली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे नऊ किलोमीटरचा हा मार्ग आता “हॉटस्पॉट” ठरला आहे. यामुळे या मार्गावर तातडीने सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात करंजीचे माजी उपसरपंच सारनाथ बक्षी, ग्रा.पं.सदस्य तथा बाजार समितीचे संचालक समीर निमगडे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख वैभव निमगडे, सामाजिक कार्यकर्ते छत्तरसिंग डांगी, राकेश चापले आणि बादल देऊरमल्ले यांचा समावेश आहे.

गोंडपिपरी – आक्सापुर मार्ग ठरतो “हॉटस्पॉट”

अहेरी – चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावरील गोंडपिपरी ते आक्सापूर हा मार्ग अलीकडे अपघातासाठी हॉटस्पॉट ठरत आहे.या मार्गावर गत काही दिवसात गंभीर अपघात झाले आहे.यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला.कुटुंबप्रमुखांचा मृत्यू झाला.मुलं अनाथ झाली.यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली.यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या भरधाव वाहनांवर “ब्रेक” लावण्याची नितांत गरज असल्याची भावना परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

*नवेगाव टोलनाक्याचा “डब्बा” रस्त्यावर..!*

गोंडपिंपरी _आष्टी महामार्गावरील नवेगाव येथील टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेला डब्बा कोसळून भर रस्त्यावर पडल्याची घटना बुधवार (१५ एप्रिल) रोजी सायंकाळी घडली. घटनेच्या वेळी या रस्त्याने कोणत्याही वाहनाची वर्दळ नसल्याने सुदैवाने मोठा अपघात झाला नाही.

मात्र एक तास वाहतूक एका बाजूने ठप्प झाली, ज्यामुळे वाहनचालकांना चुकीच्या विरुद्ध बाजूने प्रवास करावा लागला. घटनेनंतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा टोलनाका बंद असून, सुविधाही अपुऱ्या प्रमाणात आहेत. अशा या टोलनाक्यावरील सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये