ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब कार्यकारिणीचा दिमाखदार पदग्रहण सोहळा.

राजू गोखरे अध्यक्षपदी, किशोर हिंगाणे सचिवपदी : समाजसेवेची परंपरा अधिक बळकट करण्याचा निर्धार.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे

राजुरा :- रोटरी क्लब राजुराच्या सत्र २०२६ – २०२७ साठी नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्याचा भव्य कार्यक्रम शुभम हॉल, राजुरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी पदाची शपथ घेत आगामी वर्षात समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आरटीएन महेश मुकुलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून असिस्टंट गव्हर्नर आरटीएन अनुपकुमार यादव, तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, प्राचार्य डॉ. संभाजी वरखड, रोटरी क्लब चंद्रपूरचे माजी अध्यक्ष आरटीएन श्रीकांत रेशीमवाले, रोटरी क्लब बल्लारपूरचे अध्यक्ष राजूजी मुंदडा, चंद्रपूर इनरव्हील क्लबचे सचिव आरटीएन कमलजी बजाज, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन यांच्यासह विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राजू विक्रम गोखरे यांनी रोटरी क्लब राजुराच्या अध्यक्षपदाची, किशोर दत्तात्रय हिंगाणे यांनी सचिवपदाची, अमजद खान यांनी उपाध्यक्षपदाची, तर आनंद मोहरील यांनी कोषाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देऊन अधिकृतपणे पदग्रहण सोहळा संपन्न करण्यात आला. प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतात रोटरी क्लबच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक करत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, युवक सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक लोकहिताचे उपक्रम राबवून रोटरीच्या सेवाभावी परंपरेला नवी उंची मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण सोहळा उत्साह, आपुलकी आणि सेवाभावाच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आरटीएन केतन जुनघरे यांनी केले, तर नवनियुक्त सचिव किशोर हिंगाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये