ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा :- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजा शिवसेना तालुकाप्रमुख दादारावजी खार्डे यांनी संत चोखामेळा जन्मभूमी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा मेव्हणा राजा या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी मंचकावर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तथा ग्रामस्थ मंडळी पालक वर्ग मोठ्या संख्येने हजर होता यावेळी विद्यार्थ्यांना एक ते सात या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही आणि पेन देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून दादाराव खार्डे यांनी साजरा केला ,तसेच मेव्हणा राजा येथील जिल्हा परिषद शाळा मध्ये शिकलेले विद्यार्थी कुमारी आरती रणजीत मोरे यांची एमबीबीएस साठी प्रवेश निश्चित झाल्यामुळे तसेच आय एस इ आर सारख्या नामांकित विद्यापीठात बी एस एम एस साठी प्रवेश निश्चित झाल्यामुळे कुमारी राजश्री सुनील डोंगरे व निखिल सुनील डोंगरे यांचाही यावेळेस सत्कार दादाराव खार्डे व उपस्थितीच्या वतीने करण्यात आला

शिवसेना तालुकाप्रमुख दादाराव खार्डे यांनी सविस्तर मार्गदर्शन उपस्थितांना केले व गुणवंत विद्यार्थ्यांचे आपल्या मनोगतातून कौतुक व्यक्त केले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष हे नेहमीच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालू असून त्यांची शिकवण 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण यानुसार आम्ही या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व गुणवंताचा सत्कार ठेवण्यात आला असे दादारावजी खार्डे यांनी सांगितले

यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी माजी सैनिक भगवान चाटे ,माजी उपसरपंच गणेश खराडे, गजानन खराडे, योगेश सोनवणे, शिवाजी राजे जाधव ,दीपक बरडे, लखन काकडे, शिवाजी चाटे, निर्मला काकडे, उषाताई डोंगरे, राजू डोंगरे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे आई-वडील सुनील डोंगरे व रणजीत मोरे यासह गावकरी मंडळी उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन घुगे यांनी केले तर गवते सर यांनी सूत्रसंचालन केले तसेच आपल्या शाळेविषयी माहिती व अडीअडचणी मुख्याध्यापक मुळे सर यांनी सविस्तर सांगितले आणि डोईफोडे सर यांनी सर्वांचे आभार मानले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये