ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस वसाहत परिसरात वृक्षारोपणासह सापांविषयी जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी, अतुल कोल्हे

भद्रावती :- सार्ड संस्था चंद्रपूर संलग्नित सर्व सर्पमित्र संघटना भद्रावतीच्या वतीने आज दि.२६ रोजी पोलिस वसाहत, पोलिस स्टेशन भद्रावती येथे वृक्षारोपण कार्यक्रम तसेच सापांविषयी जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी साप हा शेतकऱ्याचा मित्र असून पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे उपस्थितांना सांगण्यात आले.

कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, एपीआय विरेंद्र केदारे तसेच भद्रावती पोलिस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे आणि एपीआय विरेंद्र केदारे यांनी सर्पमित्रांच्या कार्याचे कौतुक करत, भविष्यात सर्पमित्रांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.

या उपक्रमाचे आयोजन सिथिल म्हैसकर व दिपक निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुप येरणे, श्रीपाद बाखरे, शैलेश पारेकर, आशिष चाहाघाटे, प्रणय खंडाळे, अभी निकोडे, प्रशिक अलिकने, यश बसाशंकर, पीयूष कडुकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच वनमजूर अमर किनाके, ललित नागपुरे व अनिल शेंद्रे यांनीही मोलाचे सहकार्य केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच सापांबाबत समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये