विदर्भ स्तरीय वरिष्ठ महिला पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत झरणा बेहरा हिचे सुवर्ण यश
२६५ किलो वजन उचलून ठरली विदर्भाची प्रथम मानकरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अतुल कोल्हे
भद्रावती :- दिनांक २५ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे आयोजित विदर्भ स्तरीय सीनियर महिला पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय, भद्रावतीची खेळाडू कु. झरणा बेहरा (इयत्ता ११ वी विज्ञान) हिने ५७ किलो वजन गटात एकूण २६५ किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकाविला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिने संपूर्ण विदर्भात विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती तसेच भद्रावती शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाचे श्रेय झरणा बेहरा हिने आई श्रीमती सीमा बेहरा, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संगीता आर. बांबोडे तसेच क्रीडा प्रशिक्षक श्री. अमोल आवळे यांना दिले.
झरणाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंतराव टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, सहसचिव राजेंद्र गावंडे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, डॉ. आस्टूनकर, डॉ. घुमे, डॉ. खामणकर, डॉ. तेलंग, प्रा. कापगते, प्रा. दाते, प्रा. बैराम यांच्यासह सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी झरणा बेहरा हिचे अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या असुन सर्वत्र कौतुक होत आहे.



