सरदार पटेल महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन
चंद्रपूर :- मेरा युवा भारत, चंद्रपूर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय विविध सांस्कृतिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. 1 ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन युवकांनी आपल्या सर्जनशीलतेचा आणि कलागुणांचा उपयोग करून नशामुक्त, निरोगी व विकसित भारताच्या निर्मितीसाठी सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत संगीत (लोकगीत), नृत्य, रील व लघुपट, पथनाट्य / मूक अभिनय, स्लॅम पोएट्री, चित्रकला, वादविवाद / वक्तृत्व आणि घोषवाक्य लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांमध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘नशामुक्त भारत’ घडविण्याच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यासाठी अधिक माहितीसाठी जिल्हा युवा अधिकारी श्री सारंग मेश्राम, चंद्रपूर – 77090 31660, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड -9518769989 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.



