ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयातील प्रा. सचिन यनगंदलवार व प्रा. अमित बोरकर यांना आचार्य पदवी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- चंद्रपूर जिल्हा येथील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती येथील विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स मधील प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.सचिन यनगंदलवार व प्रा. अमित बोरकर यांनी नुकतेच आपले शोधप्रबंध यशस्वीरीत्या सादर करून आचार्य पदवी प्राप्त केली आहे.

प्रा. सचिन यनगंदलवार यांनी गडचिरोली जिल्हा येथील आदिवासी समाजाच्या सवयी, अधिवास व जैवविविधता संवर्धनातील भूमिकेचा वंशवृक्षीय अभ्यास या विषयावर संशोधन सादर केल्याबद्दल त्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली आहे.

तसेच प्रा. अमित बोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण लोकसंख्येमधील लिम्फॅटिक फायलेरियासिस या दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजाराचा तुलनात्मक साथरोगशास्त्रीय अभ्यास या विषयावर संशोधन सादर करून आचार्य पदवी संपादन केली आहे.

त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील ही महत्त्वपूर्ण शैक्षणिक कामगिरी असून, त्यांच्या अभ्यासपूर्ण संशोधनकार्याची व सातत्यपूर्ण समर्पणाची ही पावती मानली जात आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल व्यंकटेश बहुउद्देशीय संस्थाचे सचिव रऊफ शेख चमन शेख, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गजानन राऊत, तसेच प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. सचिन यनगंदलवार व प्रा. अमित बोरकर यांचे आचार्य पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये