ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पैनगंगा खुल्या खाणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या पावन निमित्ताने वेकोली वणी क्षेत्रातील पैनगंगा खुल्या खाण उपक्षेत्र व्यवस्थापन, सिस्टा (कोल इंडिया एस.सी./एस.टी. एम्प्लॉयी असोसिएशन) आणि कौन्सिल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा गाडेगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

पैनगंगा खाण कँटीन परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅगा, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या वेळी उपक्षेत्र व्यवस्थापक मनीष पोड, खान व्यवस्थापक आर. के. सिंह, गाडेगाव खान व्यवस्थापक आर. भी. सिंह, एक्स्कॅव्हेशन विभागाचे भाटी, ब्लास्टिंग विभागाचे परियार, नोडल अधिकारी राहुल परेकर, कार्मिक व्यवस्थापक ललित तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सिस्टा पैनगंगा उपक्षेत्र तसेच ऑल इंडिया शेड्यूल कास्ट/शेड्यूल ट्रायबल्स/बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉयी ऑर्डिनेशन कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आणि कामगारांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, वंचित आणि शोषित घटकांचे मुक्तिदाते तसेच ज्ञानाचे प्रतीक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम श्रद्धा, सन्मान आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाला एच.एम.एस. संघटनेचे एरिया पदाधिकारी बेले, जियाउल्ला खान, बी.एम.एस. एरिया पदाधिकारी मकोडे, कौन्सिल एरिया पदाधिकारी पूनम डोके, ओ.बी.सी. बॅकवर्ड एरिया पदाधिकारी श्रीकांत सवे, एच.एम.एस. युनिट पदाधिकारी अरविंद उलमाले, हर्षल निकाडे, श्याम सिंधुला, बी.एम.एस. युनिटचे राजेंद्र पाचभाई, नवनाथ जेनेकर, आयटक युनिटचे राकेश कुमरे, रोशन खेलजलकर, सीटू युनिटचे निखिल चोकांद्रे, प्रवीण कोटे, कौन्सिल युनिटचे रवि सूर्यवंशी, विजय वानखेडे, सिस्टा युनिटचे संपत आरेली, स्नेहल काटकर, वैभव दिवे, तसेच इनमोसा पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय मोहन दुर्गम, गोकुळ दुर्योधन, महेंद्र देटे, गाडेगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गणेश आणि वैशाली तसेच खाण क्षेत्रातील जनरल व प्रथम पाळीतील सर्व कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये