ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोरीस गेलेली मोपेड मोटरसायकल आरोपीच्या कपड्यावरून आरोपीचा शोध घेऊन मोटरसायकल हस्तगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे फिर्यादी नामें इंदुबाई विनोद कुमार कबाडे वय 30 वर्ष रा. चंद्रपूर यांनी रेल्वे स्टेशन चंद्रपूर येथे त्यांची ऍक्टिवा 4 G मोपेड उभी करून बुकिंग ऑफीस येथे गेल्या असता त्यांची दुचाकी क्र MH 34 BL1369 ही चोरून नेल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे अप. क्र. 68/26 कलम 303 (2) BNS अन्वये दिनांक 08/04/ 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित आरोपीचा शोध घेणे करिता गुप्त बातमीदार नेमून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामें नरेश समाधान भांगे वय 42 रा.अमरावती यास पो स्टाफ मार्फतीने ताब्यात घेऊन चोरीस गेलेली मोपेड दुचाकी MH 34 BL1369 कि 90000/- रु. ची मोपेड आरोपीकडून जप्त करून त्यास अटक करण्यात आली.

पुढील तपास सुरु आहे सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक लोहमार्ग नागपूर श्री मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे यांचे मार्गदर्शनात सपोनि पंकज ढोके प्रभारी अधिकारी रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा, पो उप नि अंगद कोतवाड , पो. अंमलदार अखिलेश चौधरी, निलेश निकोडे, चंदन डेहनकर यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये