ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोजोलीतील साक्षी ठरली पहिली महिला पोलीस

जिल्हा परिषद शाळेकडून साक्षीचा सत्कार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली हे आदिवासी बहुल गाव असून या गावातील साक्षीने आपल्या जिद्द, चिकाटी आणि विश्वासाच्या जोरावर नुकतीच झालेल्या चंद्रपूर पोलीस भरती मध्ये नेत्रदीपक यश संपादन करून पालकांसोबतच गावाचेही नाव उज्वल केले.

शिक्षण घेत असतानाच साक्षी कळते या युवतीने आपले ध्येय निश्चित केले की, मी पोलीसच बनणार. तिने केलेला हा निश्चय तिने पूर्ण केल्याने तिला खूप अभिमान वाटत असल्याचे असे मत साक्षीने सत्कार प्रसंगी व्यक्त केले.

साक्षी रमेश कडते या मुलीचा शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोजोली मक्ता येथे सातवीपर्यंत झाले. त्यानंतर तिने पुढील शिक्षण गोंडपिपरी येथे पूर्ण करून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर येथील एका प्रशिक्षण वर्गाला प्रवेश घेतला आणि सतत प्रयत्न करून ती चंद्रपूर पोलीस विभागात आपली जागा निश्चित केली. त्यामुळे सर्व परिसरातून तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बिंदू पेंदोर, सदस्या भावना शेंडे, किशोर शेडमाके, संतोष कडते, मुख्याध्यापक मुरलीधर सरकार , शिक्षक भावेश विश्वास, साधना उराडे, विकास शेंडे यांसह पालक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये