ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाकेबंदी करून देशी दारूने भरलेल्या 24 पेट्या व चार चाकी वाहनासह 10 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

    याप्रमाणे आहे कि, दिनांक 27/07/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तर्फे पुलगाव डिव्हिजनमध्ये अवैद्य धंदयावर कारवाई संबंधाने पेट्रोलींग करीत असताना मुखबीर कडून खबर मिळाली कि वायगाव निपाणी येथे राहणारे 1) रामेश्वर कारमोरे 2) चेतन महाकाळकर दोन्ही राहणार वायगाव (निपाणी ) ता. देवळी जिल्हा वर्धा हे एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी फ्रॉन्स कंपनीच्या गाडीने रामकृष्ण विष्णूजी डुबडुबे राहणार गोडेगाव यास देशी व विदेशी दारूचा माल देण्याकरिता जात आहे अश्या माहितीवरून नाकेबंदी करून नमूद आरोपीतावर रेड केला असता त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागताच दोन्ही आरोपी मोक्क्यावरून पसार झाले वरून रामकृष्ण दुबडुबे राहणार गोडेगाव ता. हिंगणघाट जि. वर्धा हा जागीच मिळून आला. सदर गाडीची पाहणी केली असता गाडीचे डिक्कीत व मागील सीटवर 1)देशी दारू गोवा नंबर 1 च्या 24 पेट्या व एक पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी फ्रॉन्स कंपनीची गाडी जिचा क्रमांक MH32AX7039 असा एकुण जु.कि. 10,80,000/- रू चा मुद्देमाल जप्ती पंचनाम्या प्रमाणे जप्त करून आरोपीतांविरुध्द पो. स्टे. अल्लीपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

 सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल,अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अंमलदार शेखर डोंगरे,मनोज धात्रक, महादेव सानप,विकास मुंडे, विनोद कापसे, सुगम चौधरी, शुभम राऊत, हर्षल सोनटक्के यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये