महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात MH-CET साठी मार्गदर्शन व्याख्यान मालेचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
इयत्ता 11 व 12 वी च्या विद्यार्थ्यांना MH-CET साठी मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदुर येथील प्राचार्य डॉ शैलेंद्र देव यांच्या पुढाकाराने IQAC विभागामार्फत MH-CET व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत यश मिळवून देण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, यांच्या वतीने इयत्ता 11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी “MH-CET 2026 साठी व्याख्यान मालेचे शुभारंभ करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ. शैलेंद्र देव* यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराचे नियोजन व संयोजन महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक व IQAC चे समन्वयक *डॉ. रामकृष्ण पटले* यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *डॉ. मनोहर बांद्रे* यांनी प्रभावी पद्धतीने केले. सुरुवातीला प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. MH-CET सारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून आपल्या गावाचे, जिल्ह्याचे नाव मोठे करा. महाविद्यालय नेहमीच तुमच्या पाठीशी आहे.”
*तज्ज्ञ प्राध्यापकांनी दिले विषयवार मार्गदर्शन*
या शिबिरात विद्यार्थ्यांना MH-CET च्या अभ्यासक्रमानुसार प्रत्येक विषयाचे सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
प्रा. पवन चटारे यांनी भौतिकशास्त्रातील महत्त्वाचे घटक, सूत्रे आणि संख्यात्मक प्रश्न सोडविण्याच्या ट्रिक्स समजावून दिल्या.
डॉ अनिस खान क्रीडा व खेळ विभागाचे प्राध्यापक व डायरेक्टर यांनी मुलांना साउंड बॉडी अँड हेल्थ यावर मार्गदर्शन व महत्त्व सांगितले.
प्रा. चेतन वानखेडे* यांनी सूक्ष्म जीव शास्त्रातील संकल्पना कशा लक्षात ठेवाव्यात याबत मार्गदर्शन केले.
डॉ संदिप घोडिले यांनी रसायनशास्त्र विषयाचे महत्त्व सांगितले.
*डॉ. अजयकुमार शर्मा* यांनी गणितातील वेळेचे व्यवस्थापन आणि शॉर्टकट पद्धतींवर भर दिला.
डॉ. उत्कर्ष मुन* यांनी जीवशास्त्रातील NCERT आधारित अभ्यास आणि आकृत्यांचे महत्त्व पटवून दिले.
*प्रा. चेतन वैद्य* यांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून परीक्षेचे स्वरूप स्पष्ट केले.
प्रत्येक प्राध्यापकांनी आपापल्या विषयातील कठीण विषय सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच अभ्यासाचे नियोजन, सराव आणि तणावमुक्त तयारी कशी करावी याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
शेकडो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद*
या शिबिराला शाळांमधील 11 वी व 12 वी च्या 300 हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराच्या सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सदर व्याख्यानमाला वर्षभर सुरू राहणार आहे व विद्यार्थ्यांना यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हानं करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभारप्रदर्शन करण्यात आले



