सिनगाव ते देऊळगाव राजा रोड वरील झाडांची अवैध वृक्षतोड तात्काळ कारवाई करा
गजानन पोटे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा :- सिनगाव जहांगीर ते देऊळगाव राजा या रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात अत्यंत बेकायदेशीर , विनापरवाना व अनधिकृतपणे वृक्षतोड करण्यात आली आहे, सार्वजनिक वनसंपत्तीची झालेली ही कत्तल गंभीर स्वरूपाचा वन गुन्हा आहे, या अवैध वृक्षतोडीस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तसेच ठेकेदारावर तात्काळ महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम व संबंधित वन कायद्यानुसार, गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी सिनगाव जहांगीर येथील नागरिक व वनरक्षक गजानन पोटे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, देऊळगाव राजा यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे, निवेदनाच्या प्रतिलिपी उप वन संरक्षक बुलढाणा यांना पाठविण्यात आल्या आहेत,
या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्यात आली नाही तर वरिष्ठ अधिकारी कडे दाद मागावी लागेल असे निवेदनात म्हटले आहे,



