ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या माती उत्खनन व वाहतूक प्रकरणात आकाश विजय तरफदार याच्यावर जप्तीची कारवाई

भद्रावती तालुक्यातील सायवन येथे करीत होता अवैध माती उत्खनन व वाहतूक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

मंडळ अधिकाऱ्यांच्या माती उत्खनन अहवालाकडे लक्ष

         भद्रावती तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या माती उत्खनन सुरु आहे. अधून मधून जप्तीच्या कारवाया होत असतात. मात्र महसूल प्रशासन पूर्णतः यावर अंकुश लावण्यास असमर्थ ठरत आहे. परवानगी न घेता माती उत्खनन करणे, अवैधरित्या वाहतूक करणे हे प्रकार सुरु असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रशासनाचे महसुल नुकसान होत आहे

अशीच एक घटना नुकतीच घडली. तालुक्यातील सायवन येथे अवैधरित्या माती उत्खनन प्रकरणात घोडपेठ येथील रहिवासी आकाश विजय तरफदार याचा ट्रक क्रमांक MH-40 AK-3117 या वाहनातुन 8 ब्रास माती अवैधरित्या वाहतुक करीत असताना जप्त करण्यात आला व माती उत्खनन करताना पोकलेन मशीन जप्त करण्यात आली. सदर कारवाई दिनांक ६ एप्रिल ला सायवन येथे दुपारी २ च्या दरम्यान मंडळ अधिकारी समीर वाटेकर व तलाठी तल्हार यांनी केली होती. त्याअनुषंगाने सायवन येथील अवैधरित्या माती उत्खनन बाबत चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्याचे पत्र स्थानिक तहसीलदारांनी मुधोली चे मंडळ अधिकारी अनिल दडमल यांना दिले आहे. माहितीनुसार अद्याप अहवाल सादर करण्यात आलेला नाही.

आकाश विजय तरफदार याने यापूर्वीही अशा प्रकारची अवैध कामे केलेली आहे. त्याच्यावर झालेल्या या कारवाई मुळे अवैध माती उत्खनन करणारा मगरमच्छ जाळ्यात अडकल्याची चर्चा आहे. तालुक्यात अशा घटना वाढत असल्याने तात्काळ माती उत्खनन अहवाल तयार करुन तरफदार याच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणात मंडळ अधिकारी व तहसीलदार नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये