महात्मा गांधी कॉलेज मध्ये शिक्षक पालक सभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी शिक्षक पालक सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉक्टर अजय कुमार शर्मा यांनी सभेचे प्रास्ताविक केले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांनी केली होती. महाविद्यालयाकडून पालकांची काय अपेक्षा आहे तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीने नवीन काय द्यायला पाहिजे हे जाणून घेण्याकरता पालकांची हितगुज करणे आवश्यक आहे.
त्यामुळे दरवर्षी महाविद्यालयामध्ये शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात येत असते याप्रसंगी मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी रोजगाराविषयी प्राचार्यांशी चर्चा केली याप्रसंगी डॉ. अनिस खान यांनी पालकांना आवाहन केले की त्यांनी आपल्या पाल्यांना नियमितपणे महाविद्यालयात पाठवण्यासाठी प्रेरित करावे जेणेकरून त्यांचा अभ्यासक्रम व महाविद्यालयीन गती विधी मध्ये विद्यार्थ्यांना सम्मिलित करता येईल. या सभेचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. मनोहर बांद्रे ग्रंथपाल यांनी केले असून याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते



