ग्रामीण तरुणाची वैचारिक भरारी!
पुरोगामी विचारांवर आधारित पुस्तकाचे लेखन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना : तालुक्यातील हेटी या खेडेगावातील एक मुलगा बि. ए. पदवीचे शिक्षणासाठी वरोरा येथे गव्हर्मेंट हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या या विद्यार्थ्याने परिवर्तनवादी अत्यंत पुरोगामी वैचारिक पुस्तक लिहिले आहे. अत्यंत कमी वयात सुजल दुबे यांनी लिहिलेले ‘अनुस्सती (लढा स्त्री शक्ती चा आणि आजची स्त्री)’ हे पुस्तक सिद्ध करते की वैचारिक वारसा जपण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते. ही साहित्यकृती केवळ पुस्तक नाही, तर भारतीय स्त्रीमुक्तीच्या संघर्षाचा ऐतिहासिक आणि वैचारिक दस्तऐवज आहे.
भारतीय समाजात जात, धर्म आणि कर्मकांडांच्या नावाखाली स्त्रीवर लादलेल्या बंधनांचे कटू वास्तव लेखकाने निर्भीडपणे मांडले आहे. मात्र तेवढ्यावर न थांबता त्या अंधःकारातून मुक्ततेचा मार्गही दाखवला आहे.
या प्रवासात राजमाता जिजाऊ, शिक्षणक्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले, त्यांच्यासोबत कार्य करणाऱ्या फातिमा शेख, स्त्रीशिक्षणासाठी झटणाऱ्या पंडिता रमाबाई, त्यागमूर्ती रमाई आंबेडकर, तसेच स्त्रीमुक्तीचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सखोल परामर्श घेण्यात आला आहे.
लेखक सांगतात की आजची स्त्री शिक्षित व स्वावलंबी झाली असली तरी तिच्या विचारांमध्ये अजूनही गुलामीची बेडी शिल्लक आहे. अंधश्रद्धा, परंपरेच्या नावाखालील अन्याय आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेचे अंधानुकरण या वास्तवाला बदलण्यासाठी इतिहासाचा प्रकाशझोत आवश्यक आहे, असे पुस्तक अधोरेखित करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा या पुस्तकावर स्पष्ट प्रभाव दिसतो. ‘मी समाजाची प्रगती मोजतो ती त्या समाजातील स्त्रीने किती प्रगती केली यावर, हा त्यांचा विचार कृतीतून साकार झाला. ‘हिंदू कोड बिल’च्या माध्यमातून त्यांनी स्त्रीला विवाह, वारसा, घटस्फोट आणि स्वातंत्र्याचे अधिकार देत सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली हा मुद्दा पुस्तकात ठळकपणे मांडला आहे. रमाई आंबेडकर यांच्या त्यागाचे चित्रण हृदयस्पर्शी आहे. बाबासाहेबांच्या यशा मागील शांत, पण प्रखर ज्वाला म्हणून त्यांचे योगदान लेखक प्रभावीपणे उभे करतात. तसेच ताराबाई शिंदे यांच्या वैचारिक बंडखोरीचा आणि शिक्षण क्रांतीतील ज्योतीबा फुले यांच्या आज स्त्रिया भारताच्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचल्या आहेत, पण अजूनही काही ठिकाणी त्यांना डोक्यावर पदर घेतल्याशिवाय घराबाहेर पडता येत नाही. मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवताना अजूनही कुटुंबांना दहा वेळा विचार करावा लागतो. ही विसंगती बदलली पाहिजे. ‘अनुस्सती’ हे पुस्तक या परिवर्तनासाठी नक्कीच कारणीभूत ठरेल, असा मला विश्वास आहे. महिलांनो, हे पुस्तक तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
– सत्यपाल महाराज, राष्ट्रीय प्रबोधनकार
योगदानाचाही उल्लेख पुस्तकात आहे. विशेष म्हणजे, या पुस्तकाला अनेक दिग्गज मान्यवरांचे मनोगत लाभले आहे. प्रबोधनसम्राट सत्यपाल महाराज, अभिनेते किरण माने, विद्रोही कवी व व्याख्याते गोविंदा पोलाद, तसेच जितेंद्र आसोले यांसारख्या मान्यवरांनी या पुस्तकाचे कौतुक करत त्याच्या वैचारिक ताकदीची दखल घेतली आहे. त्यांच्या मनोगतातूनही ‘अनुस्सती’चे सामाजिक महत्त्व अधोरेखित होते. एकंदरीत, ‘अनुस्सती’ हे पुस्तक प्रत्येक स्त्री-पुरुषाला आत्मपरीक्षणाचा प्रश्न विचारते
‘तुला मुक्त कोणी केलं? ‘विशेष म्हणजे लेखकाने पुस्तकाचे मुखपृष्ठ ते पुस्तकाची शब्दरचना टायपिंग सर्व मोबाईल चा वापर करून स्वता तयार केले आहे. लेखन शैली सोपी, प्रवाही आणि विचारांना चालना देणारी आहे. इतिहासाच्या पानांतून वर्तमानाला आरसा दाखवत हे पुस्तक समाजाला जागृत करण्याचे कार्य करते. तरुण वयात इतक्या प्रगल्भविषयावर लेखन करणाऱ्या सुजल दुबे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हे पुस्तक निश्चितच समाजाला नवी प्रेरणादायी दिशा देणारे आहे.



