ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“चांदा ब्लास्ट”चा दणका* ; अध्यक्ष खुशाल लोडे यांच्या पाठपुराव्याला यश

असोला-मेंढा कालव्याला आजपासून पाणी सोडले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली : _दिनांक १३/०७/२०२६ रोजी “चांदा ब्लास्ट”ला पाण्याविना धोक्यात आली खरीपाची धान रोपणी” या मथळ्याखाली सावली तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याअभावी होणारी अडचण प्रसिद्ध झाली होती.

त्या बातमीची दखल घेत गोसीखुर्द प्रकल्पातील असोला-मेंढा उजवा कालव्याचे पाणी आज अधिकृतपणे सोडण्यात आले आहे.

खुशाल लोडे विविध सेवा सहकारी संस्था अध्यक्ष यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रशासनाकडे केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे.

*3 दिवसांत पाणी शेतात पोहोचणार*

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालव्याद्वारे सोडले पाणी आपल्या भागातील शेतांपर्यंत पोहोचायला अंदाजे 3 दिवसांचा कालावधी लागणार आहे.

जून-जुलैमध्ये पावसाअभावी तालुक्यातील खरिपाची धान रोपे सुकून चालली होती. रोवणी अर्ध्यावर थांबली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात होते.

आता या जीवनदायी पाण्यामुळे सुकत चाललेल्या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. संपूर्ण सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे.

*शेतकऱ्यांच्या जिद्दीला यश – खुशाल लोडे*

याबाबत अध्यक्ष खुशाल लोडे म्हणाले, “पावसाअभावी शेतकरी अडचणीत होता. वेळेवर पाणी न मिळाल्यास संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात येणार होता. म्हणूनच प्रशासनाकडे आम्ही तातडीने कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. आज त्या मागणीला यश आले आहे.”

या मागणीसाठी सुशील डहलकर, कालिदास मंगर, रमाकांत वाघरे, खुशाल चुधरी, विठ्ठल वाढणकर, विवेक बारेकर, जितू लाडे, बंडू गुरनुले, विनोद भंडारे, प्रभाकर भोयर, हर्षल मुंघांटे, वामन दाजगाये, अभय दाजगाये, अविनाश बेले, महेश गुरुनुले, दिलीप भोयर, हेमंत धुर्वे, दौलत धुर्वे, जितू टेंभुर्णे, मनोहर पालपणकर यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी पुढाकार घेतला होता.

*शेतकऱ्यांना आवाहन*

पाणी उपलब्ध झाले असले तरी त्याचा काटकसरीने आणि योग्य वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये