ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
उद्या पालकमंत्री चंद्रपुरात

चांदा ब्लास्ट
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे गुरुवार, दि. 16 जुलै 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. 16 जुलै रोजी नियोजन भवन, चंद्रपूर येथील सभागृहात दुपारी 12.00 वाजता ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विविध विषयांसंदर्भातील आढावा बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र लिमिटेड कंपनीसोबत बैठक घेतील.
त्यानंतर दुपारी 1.00 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कोळसा खाणी व कोल वॉशरीज यांच्याशी संबंधित विविध विषयांबाबत आढावा बैठकीस उपस्थित राहून संबंधित विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतील.



