प्रेरणा महाविद्यालय गडचांदूर येथे महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
महान संस्कृत कवी, नाटककार आणि भारतीय साहित्यविश्वातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व महाकवी कालिदास यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा प्रशासकीय महविद्यालय गडचांदूर येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी कालिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या साहित्यसेवेचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना महाविद्यालयचे प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी महाकवी कालिदास हे संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ कवी व नाटककार असून त्यांच्या अभिज्ञानशाकुंतलम्, मेघदूतम्, रघुवंशम् आणि कुमारसंभवम् या साहित्यकृती आजही भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असल्याचे सांगितले. तर प्रा. छाया गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासून साहित्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कालिदास यांच्या साहित्यावर,मनोगते व्यक्त केली. शेवटी सर्वांनी त्यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करून भारतीय संस्कृती आणि भाषेच्या जतनाचा संकल्प केला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य नानेश्वर धोटे, तरप्रमुख अतिथी म्हणून प्रा. छाया गायकवाड,प्रा.सचिन धनवलकर,ख़ुशी करमणकर,प्रतीक मून, अर्चना मुठ्यालवार उपस्थित होते.कार्यक्रमास महाविद्यालयचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कु. चंदा कोटनाके हिने तर प्रमुख अतिथीचे आभार स्नेहल अलाम हिने मानले.



