जाफराबाद चौफुलीवर होत असलेल्या अपघातास केवळ अभियंताच जबाबदार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
(2003 व 2008 मध्ये या योजनेत भूसंपादन प्रक्रियेचे प्रस्ताव झाले व्यापगत कार्यवाही शून्य)
या रस्त्याच्या कामाला सुरुवातीपासूनच लागले होते ग्रहण, अनेक तांत्रिक अडचणीवर मात करत हा मार्ग पूर्णत्वास नेण्यात आला ,मात्र अभियंत्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळेच जाफराबाद चौफुलीवर अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही
देऊळगाव राजा : शहरासाठी महत प्रयासानंतर 2001 मध्ये शासनाने सुरुवातीला बांधा वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या योजनेत वळण रस्त्याला मान्यता दिली 1998 मध्ये अकोला येथील यंत्रणेने हा मार्ग कसा असेल याबाबत त्याचे डिझाइन तयार करून ठिकठिकाणी अपेक्स पॉईंट उभारण्यात आले ज्यावेळी अपेक्स पॉईंट उभारणी झाली त्यावेळी सदर जमीन ही पूर्णपणे शेतजमीन होती काही खाजगी काही शासकीय अपेक्स पॉईंट नुसारच काम होणे अपेक्षित होते मात्र संबंधित अभियंत्यांनी स्वतःच्या आर्थिक फायदा करून घेत काही ठिकाणी अपेक्स पॉईंटची सरका सरकी करून टाकली त्यामुळे वळण रस्त्याचे डिझाईन चुकले व जाफराबाद चौकीलीवर सतत अपघाताची मालिका सुरू आहे वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणी प्रथम वेळेस जो वळण रस्ता मंजूर केला व जे डिझाईन न.प.च्या विकास आराखड्यात (नकाशात)नमूद केले.
त्याची तपासणी करण्यात यावी व संबंधित दोषी व्यक्तीविरुद्ध नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्याची मागणी पुढे येत आहे. देऊळगाव राजा शहरासाठी वळण रस्त्याची आवश्यकता असल्याने 1998 मध्ये मान्यता देण्यात आली व या वळण रस्त्याचे बांधकाम जालना ते खामगाव या मार्गामध्ये समावेश करण्यात आला ,साडेचार किलोमीटर लांबीचा हा वळण रस्त्या अनेक ठिकाणी खाजगी शेत जमिनीतून जाणार होता व रस्ता करत असताना याचे रेखांकन अकोला येथील यंत्रणेने तयार केले व प्रत्यक्ष जागेवर ठीक ठिकाणी अपेक्स पॉईंटउभारले व या रेखांकनाची नोंद न. प .च्या विकास आराखड्यात करण्यात आली पण ज्या खाजगी जमिनीतून हा मार्ग जाणार होता त्यासाठी त्या जमिनी संपादित करण्यासाठी 2003 मध्ये भूसंपादन प्रकरण राबण्यात आले प्रक्रिया वेळच्या पूर्ण न झाल्याने हे प्रकरण व्यपगत झाले परत 2008 मध्ये नव्याने भूसंपादन प्रकरण राबविण्यात आले याहीवेळी वेळेच्या आत प्रकरण पूर्ण न झाल्याने प्रकरण व्यापक झाले. राज्यातील हे पहिलेच असे प्रकरन आहे की एखाद्या विकास कामांमध्ये जमीन संपादन करण्यासाठी दोन वेळेस भूसंपादन प्रकरण व्यपगत होते.
परत 2013 मध्ये नव्याने भूसंपादन प्रकरण राबवण्यात आले हे सर्व होत असताना बांधा वापरा व हस्तांतरित करा हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले रस्त्याचे बांधकाम ठप्प झाले ज्या ज्या कंत्राटदाराने हे काम घेतले होते त्यांनी अर्धवट रस्त्याचे काम करून काम बंद करून टाकले नंतर वळण रस्त्याचे काम व जालना ते बेरळाफाटा पर्यंत चे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे वर्ग करण्यात आले असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावेळी वळण रस्त्यासाठीची संपूर्ण जमीन ताब्यात नसतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास चुकीची माहिती देत जमीन ताब्यात असल्याबाबत लेखी पत्र देऊन वळण रस्त्यासाठीची जमीन हस्तांतरित केली जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली करायची होती त्यावेळी अपेक्स पॉईंटची सरका सरकी झालेली असल्यामुळे न.प.च्या विकास आराखड्यातील काही आरक्षित जागेला बाधा पोहोचू लागली.
त्यामुळे तत्कालिन नगर विकास मंत्राकडे तत्कालीन लोकप्रतिनिधी डॉ. राजेन्द्र शिंगणे यांनी पाठपुरावा करून ज्या अभियंत्याने अपेक्स पॉईंट सरकवके आले होते ते त्याच स्थितीत ठेवून मंत्रालयीन स्तरावरून त्या वळण रस्त्याचे कामाला मान्यता मिळवून घेतली त्यामुळे रस्त्याचे रेखांकन प्रमाणे काम झाले नाही व वळण रस्त्याची या अभियंताने व्याख्याच बदलून टाकली व सतत जाफराबाद चौफुलीवर अपघात घडत आहे तांत्रिक दृष्ट्या काही ठिकाणी फेरफार झाल्यानेच हे अपघात घडत आहेत त्याबाबत संबंधित विभागाच्या यंत्रणा प्रमुखांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्ती विरुद्ध कार्यवाही प्रस्तावित करावी अशी मागणी समोर येत आहे.



