ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीत महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षातर्फे गोंडपिपरी येथे भव्य मोफत महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या आयोजनात दिनांक २१ जुलै रोजी स्थानिक कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात होत असलेल्या या शिबिराचा नागरिकांनी उपस्थित राहून विविध वैद्यकीय तपासण्यांचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये दंत तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदाब (BP), मधुमेह (Sugar), कान-नाक-घसा (ENT), त्वचारोग तपासणी, स्त्री रोग तपासणी, मुखरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, सर्जरी व मेडिसिन तपासणी इत्यादी अनेक प्रकारच्या आरोग्य चाचण्या मोफत करण्यात येणार असून, याशिवाय अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांना मोफत आरोग्य मार्गदर्शन आणि औषधोपचार पुरवले जाणार आहेत. गरजू रुग्णांसाठी आयुष्मान भारत कार्ड आणि आभा (ABHA) कार्ड नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शिबिरातील प्राथमिक तपासणीनंतर ज्या रुग्णांना दंतविकार किंवा कर्करोग यांच्या पुढील उपचारांसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी प्रख्यात डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत सोय करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना नेत्र चष्म्याची आवश्यकता आहे,त्यांना शिबिरातच चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. शिबिरानंतर किरकोळ आजारांवर एक महिना मोफत औषधपुरवठा केला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस हा नेहमीच समाजसेवा आणि लोकोपयोगी कामांच्या माध्यमातून साजरा करण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत आयोजित या आरोग्य शिबिरांना नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले असून, पावसाळ्याच्या दिवसात सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरणार असल्याची माहिती भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये