ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे रुजु 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांचे स्थानांतर पिंपरी चिंचवड येथे झाले असून त्यांच्या रिक्त जागी अर्जुन ठोसरे यांनी नुकताच पदभार सांभाळला आहे

श्री ठोसरे येथे रुजु होण्यापूर्वी अमरावती येथे कार्यरत होते, अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे ठोसरे साहेब यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेकडून सहकार्य अपेक्षित केले आहे, अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध महाविद्यालयामध्ये सायबर सुरक्षा, महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, सामजिक सुरक्षा, कायदेविषयक जनजागृती, कार्यक्रम राबविण्यात आले असून मार्गदर्शन केले आहे, अशाच प्रकारचे उपक्रम देऊळगाव राजा शहरात राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

तालुका पत्रकार संघ तसेच विविध सामाजिक संघटना च्या वतीने त्यांचे स्वागत केले असून पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये