दीनदयाल महाविद्यालय देऊळगाव राजा येथे माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’
जुन्या आठवणींना उजाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दीनदयाल विद्यालय येथे तब्बल 17 वर्षांनी विद्यार्थी आणि त्यांचे सर्व शिक्षक पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी शाळेमध्ये एक वर्ग भरवून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी प्रत्येकाच्या मनात भावनांचा पूर उसळला होता.
सध्या शाळा, कॉलेज आणि नातेवाईकांचे गेट-टुगेदर ट्रेंडिंग ठरत असून, 17 वर्षांनंतरची बॅच किंवा जुने मित्र मैत्रिणी हॉटेल, रिसॉर्ट्समध्ये एकत्र येऊन आठवणींना उजाळा देत आहेत. कामाच्या व्यापातून वेळ काढून मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी हे स्नेहमेळावे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत, ज्यामुळे जुना गोडवा टिकून राहतो.
दीनदयाल विद्यालयाचे ग्रामीण भागातील गोर गरीब विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्व पूर्ण काम करत असते याची जान या ठिकाणी शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात असल्याने या शाळेविषयी विशेष आकर्षण आहे
दीनदयाल विद्यालय येथे 2008 मध्ये 10 वी च्या विदयार्थ्यांनी एकत्र येत गेट टू गेदर चा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पाडला
या माजी विदयार्थ्यांनी शाळेतील गरीब गरजू विध्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी साठी 7111रु ची आर्थिक मदत केली, यामुळे एक सामाजिक संदेश प्राप्त झाला ,
या प्रसंगी शाळेमधील शिक्षक श्री सोपानराव हिम्मतराव वाघ श्री पंजाबराव लक्ष्मणराव टेकाळे श्री रमेश कारभारी डोईफोडे सौ विजयाताई हुकुमचंद खंडारे श्री शैलेन्द्र कुमार नारायणदास व्यास श्री विवेक मधुकर शिंगणे श्री कृष्णा शामराव खडके हे उपस्थित होते
तसेच हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रियंका वाघ, सुजाता वानखेडे, प्रवीण ससाने, रंगनाथ गवई, हरिष जाधव, गुलाब पठाण, भाग्यश्री डोईफोडे, वर्षा मुंढे यांनी परिश्रम घेतले



