ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिव्हाळा तर्फे ‘ वृत्तपत्र विक्रेता दिन ‘ साजरा 

वृत्तपत्र विक्रेता बांधवाचा करण्यात आला सन्मान 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : येथील एकोरी वार्डातील जिव्हाळा मित्र मंडळातर्फे ‘वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला.महात्मा गांधी चौकात महानगरपालिके समोर विविध वर्तमानपत्रे विक्री करणारे वृत्तपत्र विक्रेता भुषण रघाताटे यांचा वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त जिव्हाळा मित्र मंडळाचे मुख्य संचालक अॅड विनोद बोरसे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.अॅड विनोद बोरसे यांनी उपस्थितांना माहिती देताना सांगितले की,ऊन,वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता भल्या पहाटे लवकर उठून वाचकांपर्यंत वर्तमानपत्रे पोहोचविण्याचे काम नियमितपणे वृत्तपत्र विक्रेते करीत असतात.त्यामुळे संगणकीय क्रांती होऊन देखील वाचन संस्कृती आजही टिकून आहे.वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान महत्त्वाचे असुन त्यांच्या कार्याचा सन्मान झाला पाहिजे असे देखील अॅड विनोद बोरसे यांनी सांगितले.

    यावेळी जिव्हाळा मित्र मंडळाचे जेष्ठ सदस्य गणेश वानोडे, रामदास चन्नुरवार, ईश्वरदास ठाकरे,संजय आसुटकर,अविनाश टेकुलवार,अनिल बोबडे,राजु तपासे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये