ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ भद्रावतीतर्फे भव्य मोफत आरोग्य तपासणी व कॅन्सर रोगनिदान शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ रोटरी क्लब ऑफ भद्रावतीतर्फे इंटरॅक्ट क्लब भद्रावती, टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन व UPHC यांच्या संयुक्त सहकार्याने शहरातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी व कॅन्सर रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला सोमवार, १३ जुलैपासून प्रारंभ झाला असून २९ जुलैपर्यंत शहरातील विविध भागांमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणीसह कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे लवकर निदान करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून आवश्यक ते आरोग्यविषयक सल्लेही दिले जाणार आहेत.

नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ भद्रावतीचे अध्यक्ष प्रवीण महाजन व सचिव विक्रांत बिसेन, रोटरीयन अनिल धानोरकर, डॉ.माला प्रेमचंद, सुधीर पारधी, किशोर खंडाळकर, हनुमान घोटेकर, अब्बास अजानी यांनी केले आहे. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा घराजवळ उपलब्ध होणार असून, कॅन्सरसारख्या आजाराचे वेळेत निदान होण्यास मोठी मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये