पोलीस पाटील यांना ई-पिक पाहणीच्या कामातून मुक्त करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
6 फेब्रुवारी 2023 आदेशानुसार पाहणीसाठी कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, अशा सेवक, व कृषी विभागाचे कर्मचारी, सार्वजनिक सेवा केंद्र चालक इत्यादीची नियुक्ती करण्यात आली आहे या देशांमध्ये पोलीस पाटील यांना कुठेही उल्लेख नाही पोलीस पाटील हे गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे शासनास आवश्यक माहिती देणे शांतता व सुरक्षितता राखणे अशी महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात ई -पिक पाहणी साठी आवश्यक असलेले स्मार्टफोन तांत्रिक प्रशिक्षण इंटरनेट सुविधा तसेच कृषी विषयक अधिकार व जबाबदार या आमच्याकडे नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून ई-पिक पाहणीचे काम करून घेणे हे शासनाचे आदेशाच्या तसेच पोलीस पाटील यांच्या कर्तव्याच्या विरोधात आहेत त्यामुळे पोलीस पाटील यांच्यावर सोपविण्यात आलेले ईं-पिक पाहणीचे काम तात्काळ रद्द करून सर्व पोलीस पाटील यांना ई – पिक पायनीचे कामातून भार मुक्त करावे तसेच आमच्याकडे पावसाळा सुरू झाल्याने आपत्ती व्यवस्थापन जबाबदारी तसेच जमीन अधिग्रहण बाबत अनेक नागरिकांमध्ये गट तट पडेल त्यानुसार वाट काढणे तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था व इतर जबाबदारी बी.एल.ओ. कामकाज चालू आहे असे अनेक कामकाज आमच्याकडे जबाबदारी आहेत त्यामुळे पोलीस पाटील यांच्यावर सोपविण्यात आलेले ई-पिक पाहणीचे काम तात्काळ रद्द करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना तालुका कोरपना यांच्यामार्फत कोरपना चे तहसीलदार मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी पांडुरंग जरीले अध्यक्ष, दिनकर जोगी,सचिन घुगुल्, पोर्णिमा चुणारकर,सुषमा किन्नाके वामन खाडे ,संध्या करीये,रवींद्र भांदेकर, पुरुषोत्तम बोडखे, वाशलिक मेश्राम,सुचिता पाचभाई,वैशाली राजुरकर,रेखा तिखट, सर्व पोलीस पाटील तालुका कमिटी यावेळी हजर होते यावेळी माननीय तहसीलदार मॅडम यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला व त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल असे सांगितले तसेच सर्व पोलीस पाटलांनी त्यांचे स्वागत करण्यात आले



