चोरीस गेलेली मोटरसायकल व अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यास सावंगी पोलीसांना 24 तासात यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी नामे प्रफुल्ल सुधाकर घोडे, रा. कुरझडी, जामठा, ता. जि. वर्धा यांनी रिपोर्ट दिला की दि.02.04.2026 रोजी त्यांनी त्यांची होंन्डा शाईन कंपनीची मोटार सायकल कमांक एम.एच./ झेड/0348 किं. 32,000/ रूपये ची भुगाव टि पॉईट ब्यौकात उभी करून ठेवली होती ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. अशा तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे.ला अप.क. 241/2026 कलम 303(2) बी.एन.एस. प्रमाणे नोंद आहे.
सदर गुन्हयाचे तपासात असताना मुखबीरकडून माहिती मिळाली की मौसा सावंगी मेधे परीसरात एक ईसम विनाकमांकाची मोटरसायकल घेवुन फिरत आहे. अशा माहितीवरून तात्काळ मा. ठाणेदार स.पो.नि. पंकज वाघोडे यांचे आदेशाने सावंगी येथील पोलीस स्टाफ रवाना होवून खबरेप्रमाणे सदर ईसमाचा शोध घेवुन त्यास विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने व सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने त्याचे ताब्यातून एक होंन्डा शाईन कंपनीची मोटार सायकल कमांक एम.एच./झेड/0348 किं. 32,000/ रूपये ची पंचासमक्ष जप्त करण्यात आली.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरमकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद, मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व पोलीस स्टाफ पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, अनिल वैद्रद्य, अमोल जाधव, हर्षवर्धन मून, यांनी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अनिल वैदय हे करीत आहे.



