ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ध्येय व चिकाटीच्या बळावर वयाच्या 24 व्या वर्षात बँकिंग क्षेत्रात पीओ म्हणून लागलेला रोहन जैन काळाच्या पडद्याआड 

बँकिंग क्षेत्रात आरबीआय मध्ये सर्वोच्च पदावर नेमणूक होणारा बुलढाणा जिल्ह्यातून हा पहिलाच अवलिया होता 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक राजेंद्र देवलालसा जैन यांचा एकुलता एक मुलगा रोहन याचा जन्म 17 डिसेंबर 1991 रोजी झाला जन्मताच त्याच्या चेहऱ्यावरचे तेज व त्याला निरोप देताना त्याच्या चेहऱ्यावरचे तेज याच किंचितसाही फरक जाणवला नाही.

प्राथमिक शिक्षणापासून ते थेट रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ग्रेड ब मध्ये नियुक्त झालेल्या या रोहनच्या अंगात ध्येय चिकाटी व अभ्यासू वृत्ती ठासून भरलेली होती. शालेय जीवनापासूनच तो प्रत्येक परीक्षेत कोणत्याही विषयाचे खाजगी क्लासेस मध्ये प्रवेश न घेता मेरीट मध्ये आलेला होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नसताना त्यांनी स्वतःच्या बुद्धीने एसएससी ते पुणे येथील नामांकित अशा सीओईपी कॉलेज मध्ये बी.टेक (MECH.)साठी प्रवेश मिळवला प्रत्येक ठिकाणी तो टॉप टेन मध्ये आला 2013 मध्ये यशस्वीपणे पदवी प्राप्त नंतर त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आयआयएम मधून एमबीए करायचे होते त्यासाठी कठीण असलेली CAT (कॉमन ऍडमिशन टेस्ट, सामायिक प्रवेश परीक्षा) त्यांनी उत्तीर्ण केली ही परीक्षा फार अवघड असून जे विद्यार्थी यूपीएससीकडे जात नाहीत ते विद्यार्थी कॅट कडे वळतात 2014 मध्ये या परीक्षेसाठी पूर्ण भारतातून एक लाख 78 हजार 322 विद्यार्थी परीक्षेत बसलेले होते व आयआयएम मध्ये केवळ 2800 जागा भराव्याच्या होत्या व त्यावेळी संपूर्ण भारतात आयआयएमचे केवळ 13 कॉलेज होते महाराष्ट्रात एकही कॉलेज नव्हते अशा स्पर्धेच्या युगात या युवकाने जिद्दीने आयआयएम साठी आपला प्रवेश निश्चित केला मात्र मनाजोगे आय आय एम मिळाले नाही म्हणून त्याने प्रवेश घेतला नाही, तर गंमत म्हणून आयबीपीएस ची परीक्षा कोणतेही बँकिंग क्षेत्राशी निगडित पुस्तकाचे वाचन न करता तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला व एकाच वेळेस या युवकाला चार बँकेत नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली व वयाच्या 24 व्या वर्षीच तो बँक ऑफ इंडिया मध्ये पीओ (प्रोबेशनरी ऑफिसर) म्हणून नोकरीस लागला नऊ वर्ष BOI मध्ये उच्च पदावर काम केल्यानंतर त्याने बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च पद गाठण्याचा निश्चय केला व नोकरी करत असतानाच 2023 मध्ये त्यांनी रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये *ग्रेड ब साठी *सहाय्यक व्यवस्थापक* ची परीक्षा पास केली यावेळी संपूर्ण भारतात केवळ 220 जागा निघालेल्या होत्या व खुल्या वर्गासाठी 110 जागा होत्या यामध्ये सुद्धा त्यांनी बाजी मारली BOI चा राजीनामा दिला व वयाच्या 32 व्या वर्षी एप्रिल 2024 मध्ये मुंबई शहरात रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीर रुजू झाला. या निवडीमुळे संपूर्ण परिवारात आनंदाचे वातावरण या अवलिया मुळे पहावयास मिळाले होते. मुंबईमध्येच नोकरी करत असताना दिनांक 2 एप्रिल 26 रोजी त्यांना हृदय विकाराचा झटका आला व त्यांचे दुःखद निधन झाले ज्यांच्या रक्तातच टॅलेंट असते त्या व्यक्तीने जिद्द व चिकाटी व ध्येय निश्चिती केल्यास कोणत्याही क्षेत्रात तो चमकणार म्हणजे चमकणार हे त्याने सिद्ध करून दाखवले. त्याच्या अकाली निधनानंतर त्याच्या परिवारावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे एवढे मात्र निश्चित. रोहन च्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये