ट्रक उलटून मोठा अपघात उडानपुलाच्या कामा मुळे दोन दिवसात दुसरी घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- नागभीड ३५३, डी, मुख्य मार्गावर सुरू असलेल्या के,सी, सी, कंपनीच्या उड्डाणपुलाच्या आणि बेजबाबदार कामामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
आज सकाळी ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तो फुलाच्या अर्धवट कामाजवळ पलटी झाला
रस्ता अरुंद होता आणि बाजूला खोल खड्डा चर खणलेला होता त्यामुळे ट्रकचे नियंत्रण सुटले आणि थेट कच्चा रस्त्याखाली पलटी झाला
विशेष म्हणजे, याच ठिकाणी गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी मोठी घटना असून, के,सी,सी, ठेकेदार कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाच्या कामामुळे मूळ रस्ता अत्यंत अरुंद करण्यात आला आहे. आज ब्रह्मपुरी वरून नागपूर मार्ग जाणाऱ्या अवजड ट्रकचा एम, एच, ४० येके. ००४८ रस्त्याच्या कडेला पुलाच्या कामासाठी खणलेल्या चरीमुळे आणि कच्च्या मातीच्या भरावामुळे ट्रकचे टायर घसरले आणि ट्रक थेट डाव्या बाजूला पलटी झाला. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
दोन दिवसांतील दुसरी घटना;
प्रशासनाचे दुर्लक्ष
दोन दिवसांपूर्वीच याच ठिकाणी एसटी बस एम,एच १४ एम,एच २३५३ गडचिरोली वरून ब्रह्मपुरी नागपूर जात होती. जवळपास 40 ते 45 प्रवासी होते. माहेर फाट्याजवळ अचानक एक दुचाकीस्वार मागच्या बाजूने वेगाने बससमोर आला त्याला वाचवण्यासाठी बस चालकाने कातळीने ब्रेक लावत गाडी डाव्या बाजूला वळवली मात्र तिथे रस्ता अरुंद होता आणि बाजूला खोल खड्डा चर खणलेला होता त्यामुळे बसचा नियंत्रण सुटले आणि ती थेट रस्त्याखाली उतरली.
अपघाताची घटना घडली होती. वारंवार अपघात होऊनही के, सी, सी, ठेकेदार कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने साधे बॅरिकेड्स किंवा रेडियम इंडिकेटर्स देखील लावलेले नाहीत. पुलाच्या कामासाठी टाकलेले साहित्य रस्त्यावरच पडून असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी तर हा परिसर अंधारात असल्याने वाहनचालकांसाठी हा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे.
ठेकेदार कंपनीच्या ‘त्या’ कामावर संताप.
प्रवासाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मते, पुलाचे काम करणाऱ्या कंपनीने सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. “दोन दिवसांत दोन मोठे अपघात होऊनही कंपनीचे अधिकारी ढिम्म आहेत. पुलाच्या कामामुळे रस्ता खराब झाला असून पादचाऱ्यांसाठीही जागा उरलेली नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी आणि स्थानिक रहिवासी यांनी दिली.
वाहतूक कोंडीने नागरिक आणि प्रवासी हैराण
ट्रक पलटी झाल्यामुळे या मार्गावर बऱ्याच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, जोपर्यंत पुलाचे काम पूर्ण होत नाही किंवा पक्का पर्यायी रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही, तोपर्यंत हे अपघात थांबणार नाहीत, अशी भीती नागरिक आणि प्रवासी व्यक्त केली जात आहे.



