ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट गुन्हे प्रगटीकरण पथकाची कार्यवाही

दुचाकी चोरी करणारा आरोपी हिंगणघाट पोलीसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी नामे स्पनील अंकुशराव बेलखेडे, वय 36 वर्ष, रा. पवनी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पो.स्टे. हिंगणघाट येथे अप. क्र. 405/2026 कलम 303 (2) भा.न्या.से. अन्वयेचा गुन्हा 25/03/2026 रोजी दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील फिर्यादी हे दिनांक 04/03/2026 रोजी त्यांचे पवनी या गावावरुन शेतीच्या कामाकरीता मजुर बघण्याकरीता त्यांची मोटार सायकल क्रमांक MH-32, AE-5362 ने हिंगणघाट येथे येत असताना मौजा छोटी वणी येथुन एका अनोळखी इसमाने लिफ्ट मागीतली व काही दुर अंतरावर येताच गाडी स्वतः चालवित फिर्यादीस मागे बसुन हिंगणघाट येथे आलेत. फिर्यादीस बांथरुमला जाणे असल्याने ते बाथरुम करीता शिवाजी मार्केट हिंगणघाट जवळ थांबले असताना लिफ्ट दिलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादीची चाबी लागुन असलेली मोटर सायकल यामाहा कंपनीची सॅलुटो क्रमांक MH-32, AE-5362 किंमत अंदाजे 30000/-रु. ची चोरुन नेली. घटने पासुन नमुद फिर्यादीने सदर अज्ञात इसमाचा व मोटर सायकलचा शोध घेतला कोठेही मिळुन न आल्याने त्यांना दिनांक 25/03/2026 रोजी पोलीस स्टेशनला येवुन तक्रार दिली.

सदर गुन्ह्याचे तपासामध्ये पोलीस स्टेशन हिंगणघाट येथिल डि.बी. पथक पो.हवा. नरेंद्र डहाके/110 व पो.हवा. श्रीकांत खडसे/663 यांचे पथकाने तपासात सुरुवात करुन अवघ्या काही तासात सि.सि.टी.व्ही. फुटेजची पाहणी करुन व मिळालेल्या गुप्त माहिती वरुन मोटर सायकल व आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे लिलेश्वर वामनराव वरभे, वय 36 वर्ष, रा. मु. सिरुड, पोस्ट अल्लीपुर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा. यास चोरुस गेलेल्या मोटर सायकल ताब्यात घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणला.

सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट श्री. सुशिल नायक साहेब यांचे मार्गदर्शना खाली मा. पोलीस निरीक्षक श्री. अनिल राऊत साहेब यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथिल गुन्हे प्रगटी करण पथकातील स.पो.नि. पद्माकर मुंडे, पो.हवा. नरेंद्र डहाके/110, पो.हवा. श्रीकांत खडसे/663, पो.हवा. जगदीश चव्हान/1309, पो.हवा. सुनिल मेंढे/1380, ना.पो.शि. निलेशसिंग सुर्यवंशी/112, ना.पो.शि. नरेंद्र आरेकर/606, ना.पो.शि. विकास अवचट/1490, ना.पो.शि. राकेश आष्टनकर/1497, पो.शि. सागर काळे/911, पो.शि. आकाश कांबळे/1517, पो.शि. राजेंद्र ढगे/1612, पो.शि. प्रमोद जाधव/1664 यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये