गोंडपिपरीत सांस्कृतिक महिला महोत्सव
भाजपा महिला आघाडीचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला आघाडीच्या वतीने “उत्सव महिलांचा _ उत्सव गोंडपिपरीचा”, आमदार सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक महिला महोत्सवाचे आयोजन स्थानिक माता कण्यका परमेश्वरी सभागृहाच्या प्रांगणात आज (२८ मार्च) रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे. या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमदार देवराव भोंगळे यांची उपस्थिती राहणार आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील विवाहित महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक महोत्सवात समूह नृत्य, एकल नृत्य, फॅन्सी ड्रेस या स्पर्धांसोबतच प्रौढ महिलांकरिता एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधून महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळणार असून, या माध्यमातून महिलांचा सांस्कृतिक विकास साधल्या जाणार आहे.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिला तथा महिला गटाला विविध प्रकारातील रोख रकमेची बक्षिसे प्राप्त होणार असून उपस्थित महिलांनाही आकर्षक कूपन भेटस्वरूपात देण्यात येणार आहे.
खास महिलांकरिता प्रथमच होणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयोजक भाजपा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.



