आपण कसं जगलं पाहिजे हे आपल्याला धर्म सांगतो _ स्वप्नील राऊत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
हिंदू धर्माला एकत्रित करून हे राष्ट्र पुन्हा परत वैभवप्रत नेण्यासाठी तसेच सर्व जाती, पंथ,भाषा आणि भेद विसरून आपल्या संस्कृतीचे संरक्षण सामुदायिक विकास करण्याचा दृष्टीने सकल हिंदू समाजा द्वारे हिंदू संमेलनाचे आयोजन संपूर्ण भारतात करणे सुरू आहे दिनांक 22 मार्च 26 रोजी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्ती या नावाने बालाजी नगर मध्ये हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बुलढाणा विभागाचे प्रचारक स्वप्निल राऊत यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की हिंदू धर्माचे आचरण प्रत्येक घराघरात झालं पाहिजे आपण कसं जगलो पाहिजे हे आपल्याला धर्म सांगतो प्रत्येकाला देव व प्रत्येकामध्ये देव पाहणारा हिंदू समाज आहे यावेळी मंचकावर जय मंगल जाधव व प्रा.अश्विनी जाधव – मेहेत्रे तर संयोजक राजेंद्र कोटेच्या सहसंयोजक अशोक शेळके व सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्रीधर जायभाये उपस्थित होते.
संपूर्ण भारतभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेला स्थापना होऊन 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हिंदू संमेलने घेऊन एकतेची हाक देण्यात येत आहे शहरातील बालाजी नगर मध्ये दिनांक 22 मार्च 26 रोजी संपन्न झालेल्या हिंदू संमेलनात आरएसएसचे स्वप्नील राऊत यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की आम्ही विविधतेत एकता असे म्हणतो सगळ्यांचा जाण्याचा मार्ग एकच आहे असे हिंदुत्व म्हणतो प्रत्येक प्राण्यांमध्ये देव पाहणारे ही आमची संस्कृती आहे प्रत्येकाला देव व प्रत्येकामध्ये देव पाहणारा हिंदू समाज आहे हिंदुत्वाच रक्षण करणे गरजेचे आहे पुढच्या पिढीमध्ये बदलाव आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.
आपण एकमेकाला भेटल्यावर राम राम करतो तर समोरचा व्यक्ती सुद्धा रामराम करतो याचा अर्थ आम्ही प्रत्येकामध्ये देव पाहतो धर्माच्या आचरणाने व्यक्ती चालतो धर्माचं आचरण घराघरात झालं पाहिजे आपण कस जगल पाहिजे हे आपल्या धर्म सांगतो आपण सगळेजण वेगवेगळ्या जातीमध्ये विखुरलेले आहोत त्यामुळे अखंड भारत निर्मित होण्यासाठी अडचणी येत आहेत आम्ही एकत्र राहू तर सेफ राहू असे त्यांनी सांगितले तर याच मंचका वरून महिला प्रतिनिधी म्हणून बोलताना प्रा अश्विनी जाधव मेहेत्रे यांनी स्री शक्ती या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की महिलाही सशक्त आहे पाडासारखा आवाज प्रत्येक महिलेने काढावा आवाजामध्ये निडर पना असला पाहिजे या देशात खरे तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नच उपस्थित का होतो मुळात ही तीच भूमी आहे जिजाऊंनी केवळ शिवरायांचे संगोपन केले
नाही तर महान स्वराज्याची पायामुळे रोवली राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजी सत्तेविरुद्ध तलवार घेऊन सर्व जगाला दाखवून दिले ती शौर्याची गाथा सावित्रीबाई फुलेंनी ज्ञानाचा दिवा हातात घेऊन अंधारमय समाजाला शिक्षण रुपी ज्योत दाखवून या ज्योतीमुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत त्यांच्यावर सुद्धा संकट आली मात्र त्यांनी त्यांचा सामना केला असे सांगीतले.आर्ट ऑफ लिव्हिंग चे जयमंगल जाधव यांनी हिंदू संमेलनाची गरज काय विषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुरुवातीला गोमाता पूजन करण्यात आले तर एका बाल कलाकाराने श्री बजरंग बलीची वेशभूषा साकारली होती सकाळीच *वासुदेव आला रे वासुदेव आला* च्या भूमिकेत गजनान खांडेभराड यांनी आयोजकांच्या सोबत परिसरात फिरून कार्यक्रमांची जनजागृती केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी या परिसरातील तमाम हिंदू समाज बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक समाधान घुगे यांनी केले. सांगता समारोप प्रसंगी भारत मातेची आरती करून उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.



