ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अँड.अर्चना घेवंदे राज्यस्तरीय “महिला रत्न” पुरस्काराने सन्मानित.!

NHRPC  ने घेतली सामाजिक योगदानाची दखल.!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

Natural Human Rights Protection Council (NHRPC) यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय  पुरस्कार सोहळ्यात 2026  चा महिला रत्न पुरस्कार अँड. अर्चना प्रदीप घेवंदे(गजबीये) यांना प्रदान करून गौरविण्यात आले.

हा भव्य आणि प्रेरणादायी पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात धुळे येथे रविवारी पार पडला. साक्री विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. मंजुळाताई गावित, अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री ना. श्री. अनिल पाटील, धुळे ग्रामीणचे आमदार श्री. राघवेंद्र मनोहर भदाणे,यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.तसेच NHRPC चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोरख देवरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या सौ. प्रतिभा शिंदे, नाशिक शहर व ग्रामीणचे DYSP श्री. वासुदेव देसले  आणि धुळे शहराचे DYSP श्री. राजकुमार उपासे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.अँड. अर्चना घेवंदे यांनी सामाजिक, कायदेशीर आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे अनेक महिलांना न्याय मिळवून देण्यास तसेच समाजात जागृती निर्माण करण्यास मोठी मदत झाली आहे.या प्रसंगी मान्यवरांनी अँड. अर्चना प्रदीप घेवंदे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा पुरस्कार भविष्यासाठी नक्कीच सकारात्मक ऊर्जा आणि अधिक जोमाने कार्यकरण्याचे बळ देणारा ठरेल असे मत अँड.अर्चना घेवंदे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा पुरस्कार सोहळा समाजातील प्रेरणादायी कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासोबतच समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संदेश देणारा ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये