देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने ज्योती पाटोळे व पत्रकार मुशीर खान कोटकर यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा,जनसेवा सामाजिक संघटना, व जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने पोलिस दलात नुकतीच निवड झालेल्या पिंपळनेर येथील कुमारी ज्योतीताई शेषराव पाटोळे तसेच पत्रकार श्री.मुशिरखान कोटकर यांना राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा आज दिनांक 24 मार्च रोजी विरंगुळा भवन येथे भावपूर्ण सत्कार करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष श्री बळीराम मापारी, होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री के.पी.खांडेभराड, विनायकराव कुळकर्णी, गोविंदराव अहिरे होते, प्रमुख पाहुणे तसेच श्री शांतिलाल निरफळे, प्रा.विजयकुमार रायमल यांनी सत्कारमूर्ती च्या कार्याचा गौरव केला, व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या, सत्कारमूर्ती यांनी सत्काराला उत्तर देताना संघटनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी प्रा.अशोक डोईफोडे.,घनश्याम भंडारे, बाबुलाल शिवरकर, अरुण सपाटे,प्रकाश दत्तवाल, विठ्ठल पाटोळे, लक्ष्मण हिवाळे.तथा इतर उपस्थित होते , कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव श्री गोविंद बोरकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



