ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लखमापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे मैत्रीपूर्ण स्नेहसंमेलन संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 लखमापूर या गावात जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी मैत्रीपूर्ण स्नेहसंमेलन आयोजित केले होते, त्यांनी आपल्या जुन्या शिक्षकांना बोलावून त्यांचा सत्कार केला. आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले,याच निमीत्ताने जुन्या आठवणीतील शिक्षकांसोबत चर्चा केली. यावेळेस करुना गावंडे मॅडम, द्रोपती दरेकर मॅडम, रीता ऊपगल्लवार मॅडम, आत्राम सर, लोहे सर, वाघमारे सर, सीरसागर सर, आणि अलावत सर, उपस्थित होते. विध्यार्थ्यांना आपल्या गुरुजनांचा मान ठेऊन त्यांना बोलावले आणि त्यांचा सत्कार केला.

लखमापुरच्या सुशिक्षित विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या लखमापूर गावातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये