ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणित प्राविण्य परीक्षेत विदित बरे तालुक्यात अव्वल

माजी विद्यार्थी मंडळाकडून गुणवंताचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

     महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे आयोजित गणित प्राविण्य परीक्षा २०२५_२६ मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोंडपिपरी (मुले) येथील विद्यार्थी विदित भगवान बरे याने प्रथम क्रमांक पटकावत तालुक्यात अव्वल येण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण तालुक्यातून यश संपादन करणारा तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे. विदितच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेचे नाव तालुक्यात उज्ज्वल झाले असून परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

        या यशाबद्दल शाळेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष विजय झाडे, सदस्य विलास नागपुरे, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष चेतनसिंग गौर, दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी संदीप रायपुरे, दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी राजू झाडे, माजी नगराध्यक्ष संजय झाडे, तसेच माजी विद्यार्थी मंडळाचे सदस्य शंकर बोरकुटे व बबलू कुडमेथे आणि इतर सदस्य उपस्थित होते.

     जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोंडपिपरी (मुले) येथे आयोजित कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका दुशलता माऊलीकर व केंद्राचे केंद्रप्रमुख अरुण झगडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद तुमडे तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्याचा सन्मान करून त्याच्या परिश्रम, चिकाटी व अभ्यासू वृत्तीचे कौतुक केले. मान्यवरांनी इतर विद्यार्थ्यांनीही विदितकडून प्रेरणा घेऊन गणित विषयात प्रावीण्य मिळवावे, असे आवाहन केले.

      या यशाबद्दल विदित बरे याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही तो असेच यश संपादन करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये