१६ वर्षीय किरण सहारेला मिळाले नवेजीवन; तनय देशकर यांच्या मदतीने झाली मोफत हृदय शस्त्रक्रिया
माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांची सहारे कुटुंबाला सदिच्छा भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथील १६ वर्षीय किरण अश्विन सहारे या मुलीवर गंभीर हृदयविकाराची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडून तिला नवजीवन मिळाले आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत पार पडली. या संपूर्ण प्रक्रियेत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्री. तनय देशकर यांच्या पुढाकारासोबतच राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याने सहारे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
किरण सहारे ही हृदयविकाराच्या गंभीर आजाराने त्रस्त होती आणि तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक होते. मात्र सहारे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे उपचारासाठी मोठे संकट उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर किरणचे आजोबा श्री. धनंजय सहारे यांनी श्री. तनय देशकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून किरणच्या वैद्यकीय उपचारासाठी मदतीची विनंती केली.
ही बाब समजताच श्री. तनय देशकर यांनी तातडीने पुढाकार घेत योग्य स्तरावर पाठपुरावा केला. या संपूर्ण प्रक्रियेत राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. यामुळे किरण सहारे हिची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे मोफत पार पडली.
दरम्यान, ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार, भाजपा नेते प्रा. अतुलभाऊ देशकर, तनय देशकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह तळोधी खुर्द येथे किरण सहारे हिच्या राहत्या घरी भेट देऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी सहारे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला व पुढील काळातही आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी सांगितले की, समाजातील अडचणीत असलेल्या कुटुंबांना योग्य वेळी मदत मिळाली तर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यामुळे किरण सहारेला नवजीवन मिळाले, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
तनय देशकर यांनीही यावेळी किरणच्या प्रकृतीबद्दल समाधान व्यक्त करत तिच्या पुढील शिक्षणासाठी व भविष्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे सांगितले.
या प्रसंगी भाजपचे तालुका उपाध्यक्ष तथा तळोधीचे सरपंच श्री. अनिल तिजारे, पूर्व तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, माजी सभापती तथा तालुका सरचिटणीस प्रा. रामलाल दोनाडकर, श्री. भास्कर तिजारे, भाजपा सोशल मीडिया तालुका संयोजक श्री. धीरज पाल, श्री. धनंजय सहारे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सहारे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, माजी आमदार प्रा. अतुल देशकर व तनय देशकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.



