दिव्यांग लाभार्थ्यासाठी यू डी आय डी कार्ड अनिवार्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचे लाभ घेणाऱ्या देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यासाठी आता यू डी आय डी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे, या संदर्भात तहसील कार्यालय देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्याना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपले यू डी आय डी कार्ड, आधार कार्डशी संलग्न करून , आधार कार्ड व यू डी आय डी कार्ड ची झेरॉक्स प्रत व आवश्यक कागदपत्रे 25 मार्च पूर्वी संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात जमा करावे, विहित मुदतीत लाभार्थ्यांनी यू आय डी कार्ड आणि आधार कार्ड ची माहिती अपडेट न केल्यास त्यांचे मासिक अनुदान थांबवले जाईल असे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी स्पष्ट केले आहे.
लाभार्थी यांनी त्यांचे आधार कार्ड व बॅक पासबुक ची प्रत तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना विभागात किंवा पटवारी यांच्या कडे जमा करावी असे आवाहन तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले आहे.



