ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयात रोजगार मेळावा यशस्वी

नामांकित कंपनीचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगावराजा, जि.बुलढाणा येथे दिनांक १२ मार्च २०२६ रोजी कॅम्पस प्लेसमेंट व रोजगार मेळावा उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. कृषी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध झाल्या.

या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ॲग्रोस्टार पुणे कंपनीचे प्रतिनिधी म्हणून संदीप बोरमळे, शिवराज शिंदे, अश्विनी आदलिंगे, तुषार इंगळे, अनिता निकम, सहर्ष बायोफर्ट प्रा. लि., नाशिक येथील मॅनेजिंग डायरेक्टर नलिनी सोनूने व व्यवस्थापक अंकुश पाटील, रेनीसन्स फर्टो केम प्रा. लि., मुंबई झोनल मॅनेजर डी. के. अवचार आणि अरविंद देशमाने या कार्यक्रमासाठी विशेषतः उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यात समर्थ कृषी महाविद्यालयातील विविध विभागांतील रिक्त जागांसाठी सुद्धा मुलाखती घेण्यात आल्या. कंपन्यांनी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या एकूण ८७ उमेदवारांनी या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची, कौशल्यांची व व्यावसायिक क्षमतेची तपासणी करून योग्य उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया पार पडली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव सतीश कायंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आपले ज्ञान, कौशल्य आणि अनुभव यांचा उपयोग करून उद्योग क्षेत्रात उत्तम कार्य करा. तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. तिचा योग्य लाभ घेऊन आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करा. असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमात समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनीही विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी आवश्यक असलेले कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यावसायिक दृष्टिकोन याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. विद्यार्थ्यांचे ज्ञान, कार्यक्षमता आणि अनुभव या कंपन्यांसाठी उपयोगी ठरतील व ते भविष्यात आपल्या करिअरमध्ये उंच शिखर गाठतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कॅम्पस प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून महाविद्यालयाच्या रोजगाराभिमुख उपक्रमांना आणखी चालना मिळाली आहे. या कार्यक्रमास उपप्राचार्य देवानंद नागरे, प्रा. गणेश घुगे, गजानन देवमाने, बद्री काळे, संजय लाड, गबाजी लाड तसेच असीम व अरबाज यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये