ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिनेश झाडे यांची रिपाइं कोरपना तालुका अध्यक्षपदी तर महासचिवपदी मुनेश्वर मेश्राम आणि चंपतभाऊ राजुरकर यांची संघटकपदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे समता सैनिक दलाच्या वर्धापनदिनानिमित्य 13 मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे होते. सदर बैठकीत पिपरी (नारंडा) येथील माजी ग्रामपंचायत सरपंच दिनेश झाडे पत्रकार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका कोरपनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपरवाही येथील सामाजिक कार्यकर्ते मुनेश्वर मेश्राम उपरवाही यांची पक्षाच्या कोरपना तालुका महासचिव आणि कुकुडसाथ येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते चंपतभाऊ राजुरकर यांची कोरपना तालुका संघटक म्हणून निवड करण्यात आली.

बैठकीला अशोककुमार उमरे, चंद्रपूर जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष सुरजभाऊ उपरे, समता सैनिक दलाचे जिल्हा समन्वयक बी. जी. गायकवाड, जेष्ठ समता सैनिक बी. बी. गेडाम, प्रभाकर खाडे, चंपतभाऊ राजुरकर, समता सैनिक दलाचे तालुका संघटक हंसराज ताकसांडे, सुनील वालदे, दिनेश झाडे, नामदेवराव लांडगे, मुन्ना मेश्राम, राजेश वाघमारे, आकाश ताकसांडे इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये